• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. javed akhtar nashik marathi literature festival speech 20 important points photos pbs

Photos : नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनातील जावेद अख्तर यांच्या भाषणातील २० महत्त्वाचे मुद्दे, फोटो पाहा…

मराठी समाजाने कायम अभिमान बाळगावी अशा गोष्टीपासून ते महाराष्ट्रात भारतातील पहिली महिला साहित्यिकापर्यंत जावेद अख्तर यांच्या भाषणातील २० महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा.

Updated: December 4, 2021 01:22 IST
Follow Us
  • १. मी हिंदी, उर्दू, बंगाली भाषांतरीत आणि युरोपीयन साहित्य वाचलं होतं. त्यामुळे मला सर्व माहिती आहे, माझ्यासारखा कुणीच नाही असं वाटत होतं. मात्र, मराठीतील 'शांतता कोर्ट चालू आहे' हे नाटक पाहून कुणीतरी माझ्या तोंडात मारली आणि मी खुर्चीवरून खाली पडल्यासारखं वाटलं : जावेद अख्तर
    1/20

    १. मी हिंदी, उर्दू, बंगाली भाषांतरीत आणि युरोपीयन साहित्य वाचलं होतं. त्यामुळे मला सर्व माहिती आहे, माझ्यासारखा कुणीच नाही असं वाटत होतं. मात्र, मराठीतील ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक पाहून कुणीतरी माझ्या तोंडात मारली आणि मी खुर्चीवरून खाली पडल्यासारखं वाटलं : जावेद अख्तर

  • 2/20

    २. मला माझ्या स्वतःचीच लाज वाटली. मी साहित्यच साहित्य असलेल्या कुटुंबात जन्म घेऊनही मला या महान लेखकाविषयी काहीच माहिती नाही. यानंतर मी विजय तेंडुलकरांचे इतर नाटकं देखील पाहिली आणि समजून घेतली. मी असा लेखक पाहिला नव्हता आणि माझे डोळे उघडले : जावेद अख्तर

  • 3/20

    ३. ८०० वर्ष असो की ४०० वर्ष असो की २०० वर्षे, मराठीचा मोठा साहित्यिक तोच आहे ज्याने केवळ जनतेशी संवाद साधला. त्या साहित्यिकांनी मी किती मोठा बौद्धिक व्यक्ती आहे हे सांगितलं नाही, त्यांनी सामान्य माणसाला समजणार नाही असं तत्वज्ञान सांगितलं नाही. ते सामान्य माणसांशी बोलत होते : जावेद अख्तर

  • 4/20

    ४. संत ज्ञानेश्वर ८०० वर्षे जुने आहेत. मात्र, ज्ञानेश्वरांनंतर ४०० वर्षांनी बनारसमध्ये समांतर साहित्यिक झाले. त्याचं नाव महाकवी तुलसीदास. तुलसीदासांनी रामायणाच्या कथा रामचरितमानस लिहिले आणि या कथा गावागावात पसरल्या : जावेद अख्तर

  • 5/20

    ५. तुलसीदासांची भाषा शेतकरी, कामगार, सामान्य माणसाची भाषा होती. त्यांनी सामान्य लोकांपर्यंत ही गोष्ट पोहचवली हे काही लोकांना आवडलं नाही. त्यांचा सामाजिक बहिष्कार झाला. जेव्हा एखादा साहित्यिक सर्वसामान्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो, त्यांना जागं करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काही लोकांना वाईट वाटतं : जावेद अख्तर

  • 6/20

    ६. “जुन्या राजा महाराजांना आणि आत्ताच्या जमिनदार, जहागिरदारांनाही साहित्य आवडतं. मात्र, ते तोपर्यंतच आवडतं जोपर्यंत कवी, लेखक चंद्र, प्रेम यावर लिहितो : जावेद अख्तर

  • 7/20

    ७. साहित्यिकांनी रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील दुःखावर, अश्रू आणि घामावर लिहिलं तर तो त्यांना धोकादायक वाटतो. आधी त्यांना वाईट वाटायचा, आता तर हे साहित्यिक राष्ट्रविरोधी देखील असल्याचा आरोप होतो : जावेद अख्तर

  • 8/20

    ८. मराठी भाषा आणि मराठी समाजाने कितीही अभिमान बाळगला तरी तो कमी पडेल अशी एक गोष्ट आहे. ती म्हणजे संत ज्ञानेश्वरांची एक बहीण होती आणि ती देखील कविता लिहित होती : जावेद अख्तर

  • 9/20

    ९. युरोपमध्ये या काळात कुणीच कविता लिहिणारी महिला नव्हती. ८०० वर्षांपूर्वी सोडा १८ व्या आणि १९ व्या शतकात फ्रान्समध्ये खूप मोठी महिला कादंबरीकार जॉर्ज सँड या पुरुषाच्या नावाने लिहायची. इंग्लंडमध्ये एक महिला जॉर्ज इलिएट नावाने लिहायची : जावेद अख्तर

  • 10/20

    १०. युरोपात मोठ्या लेखिका असूनही त्यांना पुरुषांच्या नावाने लिहावं लागलं. कारण बाई कसं लिहू शकते असा विचार २००-२५० वर्षांपूर्वी युरोपमध्ये होता : जावेद अख्तर

  • 11/20

    ११. आमच्याकडे ८०० वर्षांपूर्वीची कवयित्री आहे. आपल्याला त्यावर अभिमान बाळगला पाहिजा. ही सामान्य गोष्ट नाही, खूप मोठी आहे : जावेद अख्तर

  • 12/20

    १२. आपल्याकडे मुक्ताबाईच नाही तर त्यानंतर बहिणाबाई देखील झाल्या. मीरा तर यांच्या ४०० वर्षांपूर्वी झाली. मात्र, ८०० वर्षांपूर्वी भारतात मराठीशिवाय कोणत्या इतर भाषेत महिला साहित्यिक असल्याची माझी माहिती नाही : जावेद अख्तर

  • 13/20

    १३. भारताची पहिली महिला डॉक्टर देखील महाराष्ट्रीय होती हे त्यामुळेच आश्चर्यकारक नाही. महाराष्ट्राच्या सभ्यतेत इतर ठिकाणांपेक्षा महिलांसाठी अधिक आदर होता : जावेद अख्तर

  • 14/20

    १४. साहित्य आणि राजकारणाचा संबंध काय? असं अनेकदा विचारलं जातं. मला अनेक लोकं भेटतात जे चांगली गाणी, कथा लिहितात. ते म्हणतात आम्हाला राजकारणात रस नाही. मी त्यांना सांगितलं की हे म्हणणं म्हणजे मला प्रदुषणात रस नाही असं म्हणण्यासारखं आहे. तुम्हाला प्रदुषणात रस असो नसो, तुम्हाला श्वासात तर तिच प्रदुषित हवा घ्यायची आहे : जावेद अख्तर

  • 15/20

    १५. साहित्यिकाला राजकारणात जायला हवं का? तर नाही, तसं करणंही चुकीचं होईल. प्रत्येक पक्षाची एक शिस्त असते, मतदारसंघ असतो. त्यांना काही गोष्टी बोलण्याची परवानगी नसते. याला कोणताही अपवाद नाही : जावेद अख्तर

  • 16/20

    १६. लोकशाहीसाठी जशी संसद, विधानसभा, राजकीय पक्ष, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष गरजेचे आहेत, तसेच असे नागरिक जे कोणत्याही बंधनात नाही गरजेचे आहेत. त्यांच्या मनाला पटेल ते त्यांना बोलता येईल. त्यांना जे लिहायचं आहे ते लिहावं. साहित्यिकाला कोणत्याही पक्षाचा बांधील व्हायला नको : जावेद अख्तर

  • 17/20

    १७. साहित्यिकाला एक संस्कार, आदर्श आणि आपल्या देशाशी इमान राखलं पाहिजे. आम्हाला जे बरोबर वाटतं आम्ही ते बोलणार, ज्यांना आवडेल त्यांना आवडेल, वाईट वाटेल त्यांना वाईट वाटो. हे स्वातंत्र्य साहित्यिकाकडे असायला हवं. सत्य हे आहे की सामान्य नागरिक असो की साहित्यिक हे स्वातंत्र्य कमी होत आहे : जावेद अख्तर

  • 18/20

    १८. १९३६ मध्ये प्रगतीशील साहित्यिक परिषद तयार झाली. तेथे अण्णाभाऊ साठे गेले होते. त्यांचं पहिल संमेलन लखनौमध्ये झालं. तिथं प्रत्येक भाषेतील लेखक होता : जावेद अख्तर

  • 19/20

    १९. प्रगतीशील साहित्यिक परिषदेत एक ठराव संमत झाला. तो ठराव होता आमची लेखणी आजपासून प्रेमकथा, फुल-ताऱ्यांच्या गोष्टी लिहिणार नाही. आजपासून आमची लेखणी देशाच्या स्वातंत्र्याविषयी लिहील, समाजातील विषमतेवर लिहील, स्त्रीयांच्या सक्षमीकरणासाठी लिहील : जावेद अख्तर

  • 20/20

    २०. १९३६ मध्ये प्रगतीशील साहित्यिक परिषदेची जितकी गरज होती त्यापेक्षा अधिक गरज आज आहे : जावेद अख्तर (सर्व फोटो सौजन्य : मुख्य मंडप युट्यूब चॅनल)

TOPICS
नाशिकNashikमराठी साहित्यMarathi Literatureसाहित्यLiterature

Web Title: Javed akhtar nashik marathi literature festival speech 20 important points photos pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.