• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. omicron is dangerous for unvaccinated people says who covid vaccination hrc

ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका कोणाला?; WHO प्रमुख उत्तर देत म्हणाले, “ज्या लोकांनी….”

ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका कोणाला आहे, यासंदर्भात WHO प्रमुखांनी उत्तर दिलंय.

Updated: January 13, 2022 17:25 IST
Follow Us
  • omicron symptoms transmission infection rate and other important information
    1/33

    गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत.

  • 2/33

    तर, करोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन ज्यामुळे अनेक देशांमध्ये करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले, त्याचा संसर्गही देशात वाढतोय.

  • 3/33

    देशात दैनंदिन रुग्ण २ लाखांपेक्षा जास्त आढळू लागले आहेत.

  • 4/33

    देशात ओमायक्रॉनचे सध्या ५ हजार ४८८ रुग्ण आहेत.

  • 5/33

    आता सापडत असलेल्या बहुतांशी रुग्णांना करोनाची सौम्य लक्षणं आढळत असल्यानं रुग्णालयात भरती होण्याचं प्रमाण कमी आहे.

  • 6/33

    ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता WHO लोकांना वारंवार सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत आहे.

  • 7/33

    बुधवारी पत्रकार परिषदेत डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम यांनी लोकांना ओमिक्रॉनच्या धोक्यांचा इशारा दिला.

  • 8/33

    टेड्रोस म्हणाले, की करोनाचा ओमायक्रॉन प्रकार अतिशय धोकादायक आहे.

  • 9/33

    यावेळी, ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका कोणाला आहे, यासंदर्भात WHO प्रमुखांनी उत्तर दिलंय.

  • 10/33

    ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही, त्यांच्यासाठी करोना जास्त धोकादायक आहे.

  • 11/33

    तर, ओमायक्रॉनमुळे जगभरात करोनाचे रुग्ण वाढले आहेत, परंतु त्याविरुद्ध लढण्याचे धैर्य आपण गमावू नये, असं आवाहन त्यांनी केलंय.

  • 12/33

    टेड्रोस म्हणाले, जरी ओमायक्रॉन डेल्टापेक्षा कमी गंभीर असला तरीही हा लसीकरण न केलेल्या लोकांसाठी एक धोकादायक विषाणू आहे.

  • 13/33

    त्यामुळे लोकांनी करोना प्रतिबंधक लस घ्यायलाच हवी.

  • 14/33

    दरम्यान, आफ्रिकेत, ८५ टक्क्यांहून अधिक लोकांना अद्याप लसीचा डोस मिळालेला नाही. जोपर्यंत आम्ही ही लसीतील तफावत दूर करत नाही तोपर्यंत आम्ही साथीच्या रोगाचा अंत करू शकत नाही, असं ते म्हणाले.

  • 15/33

    प्रत्येक देशाने सप्टेंबर २०२१ पर्यंत आपल्या लोकसंख्येच्या १० टक्के, डिसेंबरच्या अखेरीस ४० टक्के आणि २०२२ च्या मध्यापर्यंत ७० टक्के लसीकरण करावे, अशी टेड्रोस यांची इच्छा होती.

  • 16/33

    परंतु ९० देश अजूनही ४० टक्क्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, त्यापैकी ३६ देशांमध्ये अजूनही 10 टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण आहे.

  • 17/33

    ते म्हणाले, की जगभरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले बहुतेक लोक असे आहेत ज्यांना लस मिळालेली नाही.

  • 18/33

    लस करोना आणि मृत्यूच्या गंभीर धोक्यापासून संरक्षण करते, असंही त्यांनी सांगितलं.

  • 19/33

    डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले, इतकेच नाही तर करोनाचे आणखी प्रकार येण्याचा धोका अजूनही आहे.

  • 20/33

    हे प्रकार ओमायक्रॉनपेक्षा वेगाने पसरू शकतात आणि अधिक प्राणघातक असू शकतात.

  • 21/33

    टेड्रोस म्हणाले की, जगभरात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दर आठवड्याला सुमारे ५० हजारांवर पोहोचली आहे.

  • 22/33

    या विषाणूसोबत जगायला शिकण्याचा अर्थ असा नाही की आपण इतके मृत्यू स्वीकारू लागलो आहोत, असंही ते म्हणाले.

  • 23/33

    ओमायक्रॉन हा घातक नसून सौम्य आहे, असं सांगणंच धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं यापूर्वी म्हटलंय.

  • 24/33

    संसर्गजन्य रोग एपिडेमियोलॉजिस्ट आणि डब्ल्यूएचओच्या कोविड-१९ च्या टेक्निकल लीड मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या होत्या की, “ओव्हरसिम्पलीफाइड नॅरेटिव्ह धोकादायक असू शकतात.

  • 25/33

    डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचा हॉस्पिटलायझेशनचा धोका कमी दिसतोय. परंतु फक्त त्यामुळे ओमायक्रॉन हा एक सौम्य आजार आहे, असं म्हणणं धोकादायक आहे.

  • 26/33

    कमी जोखीम असतानाही वाढती रुग्णसंख्या आश्चर्यचकित करणारी आहेत, त्यामुळे येत्या काळात रुग्णालयांमध्ये जागा मिळणार नाही. त्यामुळे सावधगिरी बाळगा,” असं आवाहन त्यांनी केलेलं.

  • 27/33

    यापूर्वी अनेकदा जागतिक आरोग्य संघटनेनं ओमायक्रॉनला गांभीर्यानं घेण्याचा सल्ला दिलाय.

  • 28/33

    ओमायक्रॉन म्हणजे सर्वसाधारण सर्दी नाही.  

  • 29/33

    यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या होत्या.

  • 30/33

    त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांच्या करोना चाचण्या करण्यात याव्यात. तसेच त्या रुग्णाचे निरीक्षण करण्यात यावे. जेणेकरुन करोनाची लाट येण्याआधीच आपण सज्ज असू, असे स्वामीनाथन म्हणाल्या होत्या.

  • 31/33

    लसीकरण वेगाने करुन आपण करोना रुग्णाचं संक्रमण अथवा संसर्ग टाळू शकतो, त्यामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या महामारी शास्त्रज्ञ डॉ. मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितलं.

  • 32/33

    दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं मंगळवारी सांगितले की, श्वसनमार्गाच्या वरील भागावर ओमायक्रॉन व्हेरियंट परिणाम करत असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे. त्यामुळे इतर व्हेरियंटच्या तुलनेत ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य आढळत आहेत.

  • 33/33

    (सर्व छायाचित्रे -प्रातिनिधीक आणि संग्रहित)

TOPICS
करोना विषाणूCoronavirusकोव्हिडCovid

Web Title: Omicron is dangerous for unvaccinated people says who covid vaccination hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.