• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. first garden for handicap people in thane sgy

PHOTOS: ठाणे शहराच्या मानपेचात आणखी एक मानाचा तुरा; उभं राहिलं राज्यातील पहिलं दिव्यांगस्नेही उद्यान

ठाण्यात दिव्यांगस्नेही उद्यान तयार करण्यात आले आहे

Updated: February 14, 2022 19:45 IST
Follow Us
  • सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तिंचाही उद्यानात विरंगुळा व्हावा, त्यांना महापुरूषांची, फुलांची माहिती मिळावी यासाठी ठाण्यात दिव्यांग स्नेही उद्यान तयार करण्यात आले आहे. या उद्यानामध्ये कट्टे, खुली व्यायामशाळा, संगीत वाद्य व्यवस्था उभारण्यात आली असून हे राज्यातील पहिले दिव्यांगस्नेही उद्यान असल्याचा दावा करण्यात येत आहे. येत्या १९ फेब्रुवारीला या उद्यानाचे लोकार्पण होणार आहे
    1/10

    सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तिंचाही उद्यानात विरंगुळा व्हावा, त्यांना महापुरूषांची, फुलांची माहिती मिळावी यासाठी ठाण्यात दिव्यांग स्नेही उद्यान तयार करण्यात आले आहे. या उद्यानामध्ये कट्टे, खुली व्यायामशाळा, संगीत वाद्य व्यवस्था उभारण्यात आली असून हे राज्यातील पहिले दिव्यांगस्नेही उद्यान असल्याचा दावा करण्यात येत आहे. येत्या १९ फेब्रुवारीला या उद्यानाचे लोकार्पण होणार आहे

  • 2/10

    महाराष्ट्रातील पहिल्यावहिल्या दिव्यांग स्नेही संवेदना उद्यानाचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या १९ फेब्रुवारी रोजी ठाणे येथे होणार आहे. शहरास मध्यवर्ती असलेल्या नौपाडा येथील लोकमान्य टिळक उद्यानाचे नूतनीकरण केलेले हे उद्यान राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांचा स्थानिक क्षेत्र विकास निधी आणि ठाणे महापालिका यांच्याद्वारे संयुक्तपणे तयार करण्यात आले आहे.

  • 3/10

    ठाणे महापालिका क्षेत्रात उद्यानांची संख्या अधिक आहे. या उद्यानात नागरिक विरंगुळ्यासाठी जात असतात. परंतु शहरात दिव्यांगासाठी विशेष अशी उद्याने नाहीत. त्यामुळे दिव्यांगांना विरंगुळ्यासाठी त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध नाही. या नागरिकांनाही त्यांच्या हक्काचे उद्यान मिळावे यासाठी लोकमान्य टिळक उद्यानात दिव्यांग स्नेही उद्यान तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

  • 4/10

    या उद्यानात ब्रेल लिपीमध्ये सूचना उपलब्ध आहेत. ठिकठिकाणी ब्रेल लिपीमध्ये फुलांची तसेच स्वातंत्ऱ्य सैनिकांची माहिती देण्यात आली आहे. दिव्यांगांना ब्रेल लिपीवरील स्पर्शाने माहिती मिळविता येणार आहे.

  • 5/10

    उद्यानात एक संवेदना विभाग देखील आहे. येथे दिव्यांग व्यक्ती गंध, आवाज, स्पर्श आणि चव यासारख्या त्यांच्या संवेदना क्षमतांचा वापर करू शकतात.

  • 6/10

    सुगंधी वनस्पतींनीयुक्त असा एक स्वतंत्र विभागही याठिकाणी आहे. विशिष्ट एक ट्रॅक देखील येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ट्रॅकवर वाळू, दगड, पाणी आणि गवत यांच्यातील फरक स्पर्शाने अनुभवता येणार आहे.

  • 7/10

    उद्यानातील खुल्या व्यायाम शाळेसोबतच या उद्यानात संगीत वाद्यांचा एक संच देखील आहे. दिव्यांगस्नेही संस्थांसाठी एक स्वतंत्र कट्टा देखील उपलब्ध करण्यात आला आहे.

  • 8/10

    उद्यानात दिव्यांगस्नेही संस्थांसाठी एक स्वतंत्र जागा देखील उपलब्ध असेल, जिथे दिव्यांग मुलांच्या पालकत्वासाठी समुपदेशन सत्रांचे आयोजन केले जाऊ शकते.

  • 9/10

    तसेच, जागतिक पटलावर प्रसिद्ध अशा दिव्यांग वीरांबद्दल माहिती देणारी छायाचित्रे आणि त्यांचे संक्षिप्त जीवनचरित्र चितारलेली एक भिंत असलेला ‘हॉल ऑफ फेम’ या उद्यानाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आहे.

  • 10/10

    हे उद्यान ठाण्यातील दिव्यांग मंडळींना समर्पित असले, तरी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांचे लोकार्पण होत असल्याने, ठाणे मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा झालेल्या महान स्वातंत्र्यसैनिक अनंत कान्हेरे यांसह इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ एक विशेष विभाग देखील उद्यानात बनवण्यात करण्यात आला आहे.

TOPICS
ठाणेThaneठाणे न्यूजThane News

Web Title: First garden for handicap people in thane sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.