• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. goa assembly elections late former cm manohar parikar son independent candidate utpal parikar lost seat bjp atanasio monserrate leads in panaji photos sdn

Goa Election Results 2022: गोवा निवडणुकीतील सर्वात चर्चेतला चेहरा उत्पल पर्रिकर अखेर पराभूत

Updated: March 10, 2022 13:16 IST
Follow Us
  • Goa Assembly Elections 2022 Utpal Parrikar
    1/9

    गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पणजी मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने पक्षाविरोधात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे बंडखोर पुत्र उत्पल पर्रिकर यांचा पराभव झाला आहे.

  • 2/9

    भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी पणजीतून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालाय. पणजीमधून भाजपाचे बाबूश मोन्सेरात विजयी झालेत.

  • 3/9

    “अपक्ष उमेदवार म्हणून मी चांगली लढत दिली. मी लोकांचे आभार मानतो. मी निकालामुळे नक्कीच निराश आहे,” अशी पहिली प्रतिक्रिया उत्पल पर्रिकर यांनी दिली आहे.

  • 4/9

    उत्पल पर्रिकरांना उमेदवारी न मिळाल्याची चर्चा देश पातळीवर झाली होती. त्यामुळे पणजी येथील निवडणूक प्रतिष्ठेचा विषय ठरला होता.

  • 5/9

    गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने २१ जानेवारी रोजी ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

  • 6/9

    उत्पल पर्रिकर यांना पणजी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

  • 7/9

    मात्र पक्षाने त्यांना पणजी मतदारसंघातून उमेदवारी नाकारली आणि वादग्रस्त आमदार बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता.

  • 8/9

    अमेरिकेतून पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उद्योगपती उत्पल पर्रिकर यांनी मार्च २०१९ मध्ये वडिलांच्या निधनानंतर राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : उत्पल पर्रिकर / ट्विटर)

TOPICS
निवडणूक २०२४Elections 2024मराठी बातम्याMarathi News

Web Title: Goa assembly elections late former cm manohar parikar son independent candidate utpal parikar lost seat bjp atanasio monserrate leads in panaji photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.