• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. up elections results 2022 yogi adityanath will create history by breaking these several records scsg

Photos: अखिलेश घाबरले, राजनाथांनी टाळले, पण योगींनी करुन दाखवले; आता एवढे विक्रम होणार योगींच्या नावे

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेताच योगी आदित्यनाथ हे अनेक विक्रमांना गवसणी घालतील.

March 10, 2022 17:46 IST
Follow Us
  • UP Elections Results 2022 yogi adityanath will create history by breaking these several record
    1/39

    पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे प्राथमिक कल हाती आले असून उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी सरकार सत्तता काबिज करेल असं चित्र दिसत आहे.

  • 2/39

    तर दुसरीकडे पंजाबमध्ये आपचा मुख्यमंत्री बसेल असं चित्र प्राथमिक कल दर्शवत आहेत. गोव्यामध्ये त्रिशंकू तर उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये कमळ फुलण्याची चिन्हं दिसत आहेत.

  • 3/39

    हे प्राथमिक कल सध्या तरी काँग्रेससाठी फारच धक्कादायक ठरत असून पंजाबसारख्या महत्वाच्या राज्यामधील सत्ताही काँग्रेसच्या हातून जाणार असं चित्र दिसतंय.

  • 4/39

    एकीकडे हा काँग्रेसाठी मोठा धक्का मानला जात असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होत काही विक्रमांना गवसणी घालणार आहेत. यावरच टाकलेली नजर…

  • 5/39

    स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशात सलग दोन वेळा मुख्यमंत्री बनवण्याचा विक्रम योगी आदित्यनाथ करण्याच्या मार्गावर आहेत.

  • 6/39

    याआधी काँग्रेसचे गोविंद वल्लभ पंत सलग दोनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते.

  • 7/39

    परंतु पंत पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा तो युनायटेड प्रोव्हिन्स होता आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. त्यामुळे स्वतंत्र भारतात हा पराक्रम करणारे योगी पहिलेच नेते ठरणार आहेत.

  • 8/39

    उत्तर प्रदेशच्या राजकारणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या पक्षाला दुसऱ्यांदा सत्ता मिळाली त्या पक्षाने आपल्या आधीच्या मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा नेतृत्व दिलं नाहीय.

  • 9/39

    १९५० पासून १९६७ दरम्यान उत्तर प्रदेशची सत्ता काँग्रेसकडे होती. मात्र गोविंद वल्लभ पंतंपासून सुरु झालेली मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा तीन मुख्यमंत्री बदलल्यानंतर चंद्रभान गुप्तांपर्यंत पोहोचली.

  • 10/39

    काँग्रेसने या कालावधीमध्ये कधीच एकाच व्यक्तीला मुख्यमंत्री पदाची दुसरी टर्म दिली नाही.

  • 11/39

    म्हणजेच १९५० ते १९६७ दरम्यान काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा दरवेळेस मुख्यमंत्री बदलण्यात आले.

  • 12/39

    त्यानंतर १९८० ते १९८९ दरम्यान पुन्हा काँग्रेस पक्ष या सर्वात महत्वाच्या राज्यात सत्तेत होता. या नऊ वर्षांमध्ये एक दोन नाही तर तब्बल पाच मुख्यमंत्री राज्याने पाहिले.

  • 13/39

    भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये १९९७ ते २००२ दरम्यान पहिल्यांदा पाच वर्षे सत्तेत राहण्याचा पराक्रम केला.

  • 14/39

    मात्र या पाच वर्षांमध्ये भाजपाला तीन मुख्यमंत्री बदलावे लागले.

  • 15/39

    भाजपाने २१ सप्टेंबर १९९७ साली पहिल्यांदा राज्यात सरकार बनवलं तेव्हा कल्याण सिंह मुख्यमंत्री झाले.

  • त्यांतर दोन वर्षांनी भाजपाचे राम प्रकाश गुप्ता मुख्यमंत्री झाले.
  • 16/39

    मात्र राम प्रकाश गुप्ता यांना एक वर्षाचा कार्यकाळही पूर्ण करता आला नाही. त्यांना ३५१ व्या दिवशी पदावरुन हटवण्यात आलं अन् त्यांच्या जागी आले राजनाथ सिंह.

  • 17/39

    राम प्रकाश गुप्ता यांच्यानंतर भाजपाने राजनाथ सिंह यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली.

  • याचप्रमाणे ३ जून १९९५ साली मायावती पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्या तेव्हाचं सरकार १८ ऑक्टोबर १९९५ पर्यंत म्हणजेच १३७ दिवस चाललं. मात्र त्यानंतर हे सरकार पडलं आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.
  • 18/39

    तब्बल दोन वर्षानंतर राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आणि मायावती दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या.

  • 19/39

    त्यानंतर त्या या पदावर अवघ्या १८४ दिवसच या पदावर राहिल्या. कारण त्या मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एका वर्षासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. त्यांना आपला कार्यकाळही पूर्ण करता आला नाही.

  • 20/39

    नोएडासंदर्भात उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये एक समज आहे. मुख्यमंत्री असताना नोएडाचा दौरा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं सरकार पुढच्या निवडणुकीला पडतं असं म्हटलं जातं.

  • 21/39

    अनेक दशकांपासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात ही गोष्ट दबक्या आवाजात कायमच चर्चेत राहिलीय. मात्र आता योगींनी हे सुद्धा खोटं ठरवलंय.

  • 22/39

    १९८८ मध्ये काँग्रेसचे वीर बहादूर सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि ते नोएडा दौऱ्यावर गेले. त्यानंतर पुढील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

  • 23/39

    नंतर १९८९ साली एन. डी. तिवारी नोएडामधील सेक्टर १२ मध्ये नेहरु पार्कच्या उद्घाटनाला गेले आणि काही दिवसांत त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं.

  • 24/39

    नंतर कल्याण सिंह आणि मुलायम सिंह यांच्यासोबतही असाच प्रकार घडला आणि हा विश्वास अधिक दृढ झाला.

  • 25/39

    मात्र आता योगींनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत या नकोश्या परंपरेलाही छेद दिलाय.

  • 26/39

    कल्याण सिंह यांची खुर्ची गेल्यानंतर राजनाथ सिंह हे भाजपाचे मुख्यमंत्री झाले.

  • 27/39

    २००० साली राजनाथ यांना नोएडाला जाण्याची संधी होती. मात्र ते नोएडाला गेले नाही.

  • 28/39

    डीएनडी उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यासाठी राजनाथ सिंह हे नोएडाला न येता दिल्लीमधूनच त्यांनी उद्घाटन केलं. मात्र नंतर त्यांचीही खुर्ची गेली.

  • 29/39

    त्यानंतर २०११ मध्ये मायावती नोएडाला आल्या आणि २०१२ मध्ये त्यांची सत्ता गेली.

  • 30/39

    नंतर मुख्यमंत्री झालेले अखिलेश यादव कधी नोएडाला आले नाहीत.

  • 31/39

    अनेकांनी नोएडा दौरा आणि पराभव एका गोष्टीबद्दलच्या चर्चेमुळे आणि पराभवाला घाबरुन अखिलेश नोएडाला मुख्यमंत्री असताना आले नाहीत असं म्हणतात.

  • 32/39

    मुख्यमंत्री आदित्यनाथ हे अनेकदा नोएडाला आले आहेत.

  • 33/39

    वेगवेगळ्या कार्यक्रमांची उद्घाटनं आणि राजकीय कारणांसाठी मागील पाच वर्षात योगींनी अनेकदा नोएडाचा दौरा केलाय.

  • 34/39

    त्यामुळेच आता या नकोश्या योगायोगामध्ये योगींचंही नाव जोडलं जातं की ते हा सारा प्रकार खोडून काढतात याबद्दल उत्तर प्रदेशच्या राजकारणात चर्चा सुरु होत्या.

  • 35/39

    मात्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाने योगी यांचा लोकप्रिय चेहराच पक्षाचा चेहरा म्हणून निवडला.

  • 36/39

    सलग दुसऱ्यांना उत्तर प्रदेशच्या जनेतेनं योगींच्या बाजून कौल दिलाय यावर केवळ औपचारिक शिक्कामोर्तब बाकी आहे.

  • 37/39

    त्यामुळे योगी जेव्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा नोएडा दौरा म्हणजे मुख्यमंत्री पद जाणार हा समज सुद्धा दूर होईल. (सर्व फोटो पीटीआय आणि इंडियन एक्सप्रेसवरुन साभार)

TOPICS
उत्तर प्रदेश निवडणुकाUP Electionयोगी आदित्यनाथYogi Adityanath

Web Title: Up elections results 2022 yogi adityanath will create history by breaking these several records scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.