-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिल्लीच्या विधानसभेत केलेलं भाषण सध्या चांगलंच चर्चेत आहे. या भाषणामध्ये अरविंद केजरीवाल यांनी ‘कश्मीर फाईल्स’ चित्रपटावरुन भाजपावर निशाणा साधला होता. मात्र यावेळी त्यांनी केलेली वक्तव्यं आणि खिल्ली उडवत असल्यामुळे त्यांनाच ट्रोल व्हावं लागत आहे.
-
अरविंद केजरीवाल काश्मिरी पंडितांचा द्वेष करतात असा आरोप नेटकऱ्यांकडून केला जात आहे.
-
ट्विटरवर #KejriwalHatesKPs #KejriwalExposed हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.
-
अरविंद केजरीवाल यांनी यावेळी अनेक राज्यांच्या सरकारांनी चित्रपटाला टॅक्स फ्री करण्यावरुन प्रश्न उपस्थित केला होता.
-
अरविंद केजरीवाल यांनी चित्रपट टॅक्स फ्री कऱण्यापेक्षा तो युट्यूबवर टाका असा सल्लाच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना दिला होता. ते म्हणाले होते की, “विवेक अग्निहोत्री यांना चित्रपट युट्यूबवर टाकायला सांगा, सर्वजण मोफत पाहतील. टॅक्स फ्री करण्याची गरज काय?,” अशी विचारणा अरविंद केजरीवाल यांनी केली होती.
-
यानंतर अनेकांनी अरविंद केजरीवाल सभागृहात भाजपा नेते चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत म्हणताना हसत असल्याचा फोटो शेअर केला.
-
अरविंद केजरीवाल यांनी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना आम आदमी पक्षात येण्याचा सल्लाही दिला.
-
ते म्हणाले की, “मेंढ्यांप्रमाणे वागणं बंद करा, आपमध्ये या. तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल. खोट्या घोषणा तुम्हाला द्याव्या लागणार नाहीत. देश उभारणीसाठी तुमचा वापर होईल. खोट्या चित्रपटांचे पोस्टर चिकटवायला आम्ही सांगणार नाही”.
-
“तुम्ही काहीही करा, पण चित्रपटांचं प्रमोशन करणं थांबवा. तुम्ही भयंकर दिसत आहात. हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही [राष्ट्रासाठी] काहीतरी करण्यासाठी राजकारणात आलात, पण आता तुम्ही चित्रपटांच्या प्रचारात गुंतला आहात,” असंही केजरीवाल यावेळी म्हणाले.
-
दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या भाषणावर नेटिझन्सने नाराजी जाहीर केली आहे.
-
कश्मीर फाईल्स चित्रपटाचं प्रमोशन करण्यात चुकीचं काय अशी विचारणा अनेकांनी केली आहे.
-
तर काही जणांनी अरविंद केजरीवाल यांना ८३, निल बट्टे, सन्नाटा, दंगल, निरजा, हिंदी मिडियमसारखे चित्रपट तुम्ही टॅक्स फ्री केले होते याची आठवण करुन दिली आहे.
-
अनेकांनी २०२५ मध्ये केजरीवालांना धडा शिकवा असं आवाहन केलं आहे.
-
अरविंद केजरीवाल यांचं भाषण नेटकऱ्यांना आवडलेलं नाही.
-
काहींनी तर केजरीवालांना निवडून आणून देणाऱ्यांनाही हे पाहण्याचं आवाहन केलं आहे.
-
हसतानाचा फोटो शेअर करत काहींनी हे टॅक्स फ्री नसल्याचा टोला लगावला आहे
-
एका युजरने पंजाबला तुम्ही या व्यक्तीला सत्ता दिल्याची आठवण करुन देत टीका केली आहे.
-
काहींनी केजरीवाल यांना काश्मिरी पंडितांची कशी हत्या झाली होती याची आठवण करुन दिली आहे.
-
घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोपही केजरीवालांवर करण्यात आला आहे
-
यावर तुमचं मत काय? केजरीवाल यांच्या भाषणाकडे तुम्ही कसं पाहता?
#KejriwalHatesKPs: ‘द कश्मीर फाईल्स’ वरुन भाजपा नेत्यांची खिल्ली उडवणं केजरीवालांवरच उलटलं; नेटकऱ्यांकडून ट्रोल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिल्लीच्या विधानसभेत केलेलं भाषण सध्या चांगलंच चर्चेत आहे
Web Title: Netizens troll arvind kejriwal for speech mocking bjp leaders promoting the kashmir files as him sgy