• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos of cm uddhav thackeray meeting with grandmother chandrabhaga shinde in paral mumbai pbs

Photos : राणा दाम्पत्याला इशारा देणार्‍या ९२ वर्षांच्या आजीबाईंची मुख्यमंत्र्यांकडून सहकुटुंब भेट; म्हणाले, “तुम्हीच आमच्या घरी…”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील “झुकेगा नहीं साला” म्हणत राणा दाम्पत्याला इशारा देणाऱ्या ९२ वर्षीय आजीबाईंची सहकुटुंब भेट घेतली.

April 24, 2022 20:32 IST
Follow Us
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील “झुकेगा नहीं साला” म्हणत राणा दाम्पत्याला इशारा देणाऱ्या ९२ वर्षीय आजीबाईंची सहकुटुंब भेट घेतली.
    1/12

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील “झुकेगा नहीं साला” म्हणत राणा दाम्पत्याला इशारा देणाऱ्या ९२ वर्षीय आजीबाईंची सहकुटुंब भेट घेतली.

  • 2/12

    यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे उपस्थित होते.

  • 3/12

    मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा शिंदे या आजींची परळमधील दाभोळकर वाडीत त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली.

  • 4/12

    चंद्रभागा आजींना भेटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी “तुम्हीच आमच्या घरी यायचं का?” अशी विचारणा करत आजींचे हात हातात घेतले आणि संवाद केला.

  • 5/12

    विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असताना मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमाला गैरहजर राहत आजींची भेट घेतली.

  • 6/12

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आजींच्या घरी आगमन होताच त्यांना ओवाळण्यात आलं.

  • 7/12

    यावेळी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना देखील ओवाळण्यात आलं.

  • 8/12

    घरात प्रवेश करताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजींचे हात हातात घेऊन संवाद साधला, तर रश्मी ठाकरे यांनी चंद्रभागा आजींची गळाभेट घेतली.

  • 9/12

    स्वतः मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेटीला आल्याने शिवसैनिक असलेल्या चंद्रभागा आजींचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

  • 10/12

    यावेळी आजींनी पुन्हा एकदा मुंबईत शिवसेनेशिवाय कोणीच येणार नाही असं म्हणत आम्ही तुमच्या सोबत असल्याचं उद्धव ठाकरे यांना सांगितलं.

  • 11/12

    यावेळी आजींच्या घरी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या.

  • 12/12

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी चंद्रभागा आजींसोबत एक कुौटुंबिक फोटो देखील काढला.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav ThackerayमुंबईMumbaiशिवसेनाShiv Sena

Web Title: Photos of cm uddhav thackeray meeting with grandmother chandrabhaga shinde in paral mumbai pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.