• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pollution kills nearly 24 lakh people in india in a year the lancet planetary health journal report scsg

धक्कादायक अहवाल! प्रदूषणामुळे दगावलेल्या भारतीयांची संख्या पाहिली का? वायू प्रदूषणाने सर्वाधिक बळी जाणाऱ्या देशांत भारत पहिला

गावखेड्यांमध्येही प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

May 20, 2022 19:02 IST
Follow Us
    Pollution Kills Nearly 24 Lakh People In India In A Year The Lancet Planetary Health journal Report
    जागतिक स्तरावर दरवर्षी नऊ दशलक्ष (९० लाख) लोक सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडतात.
  • 1/18

    २००० सालापासून कार, ट्रक आणि उद्योगातील दूषित हवेमुळे मृत्यूची संख्या ५५ टक्क्यांनी वाढली आहे.

  • 2/18

    ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नल’मधील नवीन अभ्यासानुसार, युनायटेड स्टेट्स अव्वल दहा राष्ट्रांमध्ये एकमेव परिपूर्ण औद्योगिक देश आहे.

  • 3/18

    अमेरिकेतही प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या जास्त आहे.

  • 4/18

    बांग्लादेश आणि इथिओपिया हे दोन्ही देश २०१९ मध्ये प्रदूषणामुळे होणाऱ्या एक लाख ४२ हजार ८८३ मृत्यूंसह सातव्या क्रमांकावर आहेत.

  • 5/18

    एकूण मृत्यूंपैकी तीन चतुर्थाश मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे झाले आहेत.

  • 6/18

    कोळशावर आधारित वीज प्रकल्प, स्टील कारखाने यासारखे स्थिर स्त्रोत आणि कार, ट्रक व बस हेदेखील वायू प्रदूषणासाठी कारणीभूत ठरले आहेत. ही एक मोठी जागतिक समस्या असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.

  • 7/18

    भारतात नवी दिल्ली येथे हिवाळ्यात वायू प्रदूषण शिखरावर असते.

  • 8/18

    गेल्यावर्षी केवळ दोन दिवस दिल्ली शहरातील हवा प्रदूषित नव्हती. चार वर्षांत पहिल्यांदाच असे घडले.

  • 9/18

    वायू प्रदूषण हे दक्षिण आशियातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे आणि मृत्यूची संख्या वाढत आहे.

  • वाहने आणि ऊर्जा निर्मितीतून विषारी वायूचे उत्सर्जन वाढत आहे, असा याचा अर्थ होतो, असेही या अभ्यासात नमूद आहे.
  • 10/18

    तसेच गावखेड्यांमध्येही प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

  • 11/18

    प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारत आणि चीन जगात आघाडीवर आहेत.

  • 12/18

    भारत आणि चीन या दोन्ही देशात वर्षांला अनुक्रमे २.४ दशलक्ष आणि २.२ दशलक्ष मृत्यू होतात.

  • 13/18

    विशेष म्हणजे, भारत आणि चीन या दोन देशांमध्ये जगातील सर्वात मोठी लोकसंख्यादेखील आहे.

  • 14/18

    २०१९ मध्ये तर सर्व प्रकारच्या प्रदूषाणामध्ये भारतात २४ लाख लोकांनी प्राण गमावलेले.

  • 15/18

    या २४ लाखांपैकी वायू प्रदूषणामुळे मरण पावलेल्यांची संख्या १६ लाख इतकी असल्याचा दावा या अहवालात करण्यात आलाय.

  • 16/18

    वायू प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंची ही संख्या जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक आहे. (प्रातिनिधिक फोटो)

TOPICS
प्रदूषणPollutionवायू प्रदूषणAir Pollution

Web Title: Pollution kills nearly 24 lakh people in india in a year the lancet planetary health journal report scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.