Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. shivsena deepali sayed bjp kirit somaiya chandrakant patil sgy

“…तर तुमचे दोन नेते आत घेऊन जाईन”; शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांचा भाजपाला जाहीर इशारा

“देवेंद्र फडणवीस म्हणतात, माझी बायको माझं ऐकत नाही. म्हणून तिला काय वाऱ्यावर सोडलं आहे का?”

Updated: May 31, 2022 17:09 IST
Follow Us
  • अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. दिपाली सय्यद यांनी मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर भाजपा नेत्या उमा खापरे यांनी त्यांना इशारा दिला असून घरात घुसून बदडून काढू असं म्हटलं आहे.
    1/12

    अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. दिपाली सय्यद यांनी मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर भाजपा नेत्या उमा खापरे यांनी त्यांना इशारा दिला असून घरात घुसून बदडून काढू असं म्हटलं आहे.

  • 2/12

    त्यानंतर दिपाली सय्यद यांनीही प्रत्युत्तर दिलं असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाला काही किंमत नाही का? अशी विचारणा केली आहे. तसंच या माझ्या घरी असं प्रतीआव्हानही दिलं आहे.

  • 3/12

    “फक्त प्रसिद्धीसाठी वक्तव्यं केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोललो तर लगेच प्रसिद्धी मिळेल हे त्यांना माहिती आहे. पण यानंतर त्या बाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाच्या इतर नेत्यांबाबत वक्तव्यं केलं तर घऱात घुसून बदडून काढू. आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशारा भाजपा नेत्या उमा खापरे यांनी दिला आहे.

  • 4/12

    दिपाली सय्यद यांनी उमा खापरेंच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की, “तुम्ही काय माझ्या घऱात, शिवसेना भवनात घुसून बदडून काढणार आहात? म्हणजे तुम्हाला याव्यतिरिक्त दुसरं राजकारण करताच येत नाही. सुरुवात तुम्ही करायची आणि आम्ही काही बोललो की आम्ही वाईट होणार”.

  • 5/12

    “नक्कीच कोणाबद्दल अशी वक्तव्यं केली नाही पाहिजेत. जसे तुमच्यासाठी पंतप्रधान महत्वाचे आहेत तसा मुख्यमंत्र्यांचा दर्जा नाहीये का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाला काही किंमत नाही का? तुम्ही काहीही बोलायचं, उचलली जीभ लावली टाळ्याला हे बरोबर आहे का?,” असे प्रश्न दिपाली सय्यद यांनी विचारले आहेत.

  • 6/12

    “काय करायचं ते करा…येताय ना माझ्या घऱी, पाहतेच मी,” असं प्रतीआव्हान दिपाली सय्यद यांनी दिलं आहे.

  • 7/12

    “तुम्ही काय माझ्या घरात घुसणार आहात? तेवढी तुमची ताकद आहे का बघा,” असा खोचक टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे.

  • 8/12

    “पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह बोलणं चुकीचं आहे हे पूर्ण महाराष्ट्र जाणतो. पण सुरुवात कोणी केली? हे भाजपाचं राजकारण आहे,” असा आरोप दिपाली सय्यद यांनी केला.

  • 9/12

    “देवेंद्र फडणवीस म्हणतात, माझी बायको माझं ऐकत नाही. म्हणून तिला काय वाऱ्यावर सोडलं आहे का? ती बोलते तर तुम्ही खपवून घेताय. ती कुणाबद्दल बोलते? मुख्यमंत्र्यांबाबतच बोलतात ना,” असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत.

  • 10/12

    “किरिट सोमय्यांनी सर्वात आधी वक्तव्य केलं त्यावर मी बोलले. चंद्रकांत पाटील आधी मसणात जा बोलले आणि नंतर पलटी मारतात. म्हणजे तुम्ही जे बोलता ते सगळं शुद्ध, पवित्र. तुम्ही बोलता ते ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांकडे बोट करायचं,” अशी टीका दिपाली सय्यद यांनी केली आहे.

  • 11/12

    “तुम्ही काय माझ्या घरात घुसणार आहात? तेवढी तुमची ताकद आहे का बघा. केसेस करायची असेल तर आधी तुमच्या नेत्यांवर करा. माझ्यावर केस केली तर तुमचे दोन नेते आतमध्ये घेऊन जाईन,” असा इशारा दिपाली सय्यद यांनी दिला आहे.

  • 12/12

    (PHOTOS: Deepali Sayed Instagram)

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPशिवसेनाShiv Sena

Web Title: Shivsena deepali sayed bjp kirit somaiya chandrakant patil sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.