• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. operation blue star anniversary know how the controversial military operation in golden temple unfolded dpj

PHOTOS ‘ऑपरेशन ब्लू स्टार’: सुवर्ण मंदिरातील ‘ते’ वादग्रस्त लष्करी ऑपरेशन कसे घडले; घ्या जाणून

ऑपरेशन ब्लू स्टार ही भारताच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त लष्करी कारवाई होती, ज्याने देशभरात अशांतता निर्माण केली होती.

June 6, 2022 17:37 IST
Follow Us
  • ऑपरेशन ब्लू स्टार हे १ ते ८ जून १९८४ दरम्यान शीख दहशतवादी व भारतीय लष्करादरम्यान अमृतसरमधील सुवर्णमंदीरात घडलेल्या चकमकीचे नाव आहे.
    1/9

    ऑपरेशन ब्लू स्टार हे १ ते ८ जून १९८४ दरम्यान शीख दहशतवादी व भारतीय लष्करादरम्यान अमृतसरमधील सुवर्णमंदीरात घडलेल्या चकमकीचे नाव आहे.

  • 2/9

    मृतसरमधील सुवर्णमंदीरात शीख अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवली होती व हे मंदीर दहशतवाद्यांचे प्रमुख तळ बनले होते.

  • 3/9

    तत्कालिन पंजाबमधील राजकीय घडामोडी, त्यातुन फुटीरतावाद्यांना वाढत जाणारा पाठिंबा, खलिस्तानची मागणी व या सर्वांना मिळणारा शीख धार्मिक पाठिंबा यासर्वांचे रुपांतर पंजाबमधील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक हिंसाचारात झाले व परिस्थिती बिघडण्यात कारणीभूत ठरले.

  • 4/9

    खेरीस ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतला व भारतीय सैन्यास कारवाईचे आदेश दिले. जर्नेल सिंह भिंद्रनवाले सह बरेच दहशतवादी यात मारले गेले, इतरांनी शरणागती पत्करली.

  • 5/9

    पण सुवर्णमंदीरात त्यावेळी बरेच नागरिकही उपस्थित होते. त्यांचाही यात मृत्यु झाला. याचमुळे शिखांचे सर्वोच्य धार्मिक स्थळ सुवर्णमंदीरातील ही कारवाई वादग्रस्त ठरली. यात सुवर्णमंदिराचेही मोठे नुकसान झाले.

  • 6/9

    हिंसाचाराची मालिका येथेच न संपता याचीच परिणिती पुढे तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच शीख सुरक्षारक्षकांकडुन झालेली हत्या व त्यानंतर उसळलेल्या शीख विरोधी दंग्यांत झाले.

  • 7/9

    इंदिरा गांधींच्या हत्येने भारतात शीखविरोधी दंगली भडकल्या, ज्या दरम्यान सुमारे ३००० शीख लोक मारले गेले.

  • 8/9

    दंगली काँग्रेस पक्षाने भडकावल्या होत्या, ज्यांनी जमावाला शीख पुरुष आणि महिलांची कत्तल करण्यास उद्युक्त केले असल्याचा आरोप केला होता.

  • 9/9

    शीख समुदायाच्या मालकीची दुकाने आणि घरे उद्ध्वस्त करण्यात आली होती. तसेच अनेक शीख लोकांना जिवंत जाळले गेल्याचे घटनाही घडल्या होत्या.

TOPICS
पंजाबमराठी बातम्याMarathi News

Web Title: Operation blue star anniversary know how the controversial military operation in golden temple unfolded dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.