-
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील देहू येथे येणार असल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
-
यासाठी १० पोलीस उपायुक्त, १० साहाय्यक पोलीस आयुक्त, १०० पोलीस निरीक्षक, ३०० पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक असे एकूण २ हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. त्यामुळे देहू परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
-
ज्या नागरिकांना सभास्थळी जायचं आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे. सकाळी ८ वाजल्यापासून जुना मुंबई महामार्गावरून देहूत केवळ व्हीआयपी व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. इतर वाहनांना प्रवेश नाही.
-
सभास्थळी जाण्यासाठी तीन रस्ते ठेवण्यात आले आहेत. तळवडे, म्हाळुंगे आणि इंदोरी बाजूने या मार्गावरूनच नागरिक येऊ शकतात. पण, देहू गावात प्रवेश करण्यास मनाई आहे.
-
नागरिकांच्या वाहनांची बायपासला सोय करण्यात आली आहे. खंडेलवाल चौकापासून परंडवाल चौकापर्यंत येण्यासाठी २० बस आहेत. तेथून चालत सभास्थळी यायचं आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली.
-
गाडीची रिमोट चावी, पर्स, बॅग, पाणी बॉटल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पॉवर बँक आत नेण्यास परवानगी नाही. त्यामुळे सभास्थळी जाणाऱ्या नागरिकांनी या वस्तू सोबत न आणता गाडीमध्येच ठेवाव्यात, असंही आवाहन पोलिसांनी केलं आहे. (फोटो सौजन्य : कृष्णा पांचाल)
Photos : देहूला छावणीचं स्वरुप, मोदींच्या सभास्थळी कसं जायचं? सामान्य नागरिकांना कुठून असणार प्रवेश? वाचा…
ज्या नागरिकांना देहूमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळी जायचं आहे त्यांना पोलिसांनी महत्त्वाची सूचना केल्या आहेत.
Web Title: Important instruction of pune police to citizens to reach at public meeting in dehu pune pbs