-
लष्कराच्या ‘अग्निपथ’ या नव्या भरती योजनेवरून देशभरात गोंधळ सुरू आहे. किमान १४ राज्यातील तरुण रस्त्यावर आले आहेत. यूपी-बिहारसारख्या राज्यांमध्ये आंदोलनांना हिंसक वळण लागले आहे.
-
उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेच्या डब्यांना आग लावली जात आहेत. सरकारी कार्यालये, भाजप नेते आणि भाजपा कार्यालयांवर दगडफेक केली जात आहे.
-
आता प्रश्न पडतो की फक्त यूपी-बिहार आणि राजस्थानमध्येच जास्त गोंधळ का? याचं उत्तर आम्ही तुम्हाला देतो
-
‘अग्निपथ भरती योजने’अंतर्गत तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे. भरतीसाठी वयोमर्यादा १७ वर्षे वरून २१ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
-
चार वर्षांच्या सेवेनंतर ७५ टक्के सैनिकांना कर्तव्यातून मुक्त करण्यात येणार आहे. इच्छूक जवानांपैकी जास्तीत जास्त २५ टक्के जवानांना यापुढेही सैन्यात सेवा करण्याची संधी मिळेल.
-
चार वर्षांच्या सेवेनंतर आम्ही पुन्हा बेरोजगार होऊ, असे तरुणांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना पूर्वीप्रमाणेच भरतीची संधी देण्यात यावी अशी मागणी करत देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत.
-
अग्निपथ योजनेविरोधात अनेक राज्यांमध्ये गदारोळ सुरू असला तरी त्याचा सर्वाधिक परिणाम यूपी आणि बिहारमध्ये दिसून येत आहे.
-
याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लष्कराच्या जमीन, जल आणि हवाई दलाच्या तिन्ही शाखांमध्ये सर्वाधिक सैनिक यूपी आणि बिहारमधून येतात.
-
राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानमधील १.५ लाख तरुण भारतीय सैन्यात वेगवेगळ्या पदांवर तैनात आहेत. बिहार तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथील १.०२ लाख तरुण सैन्यात आहेत.
-
पंजाब चौथ्या क्रमांकावर आहे. पंजाबमधील ९४ हजार ७२३ तरुण भारतीय लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये सेवा देत आहेत.
-
आकडेवारीनुसार, या पाच वर्षांत उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक ३७ हजार ४५९ जवानांची भरती करण्यात आली.
-
पंजाबमधून २८ हजार ३०६, राजस्थानमधून २५ हजार ३९९, महाराष्ट्रातून २४ हजार १०३, बिहारमधून १६ हजार २८१ तरुण सैन्यात भरती झाले.
Photos : ‘अग्निपथ’ योजनेला युपी-बिहारमधून सर्वाधिक विरोध का? सैन्य भरतीमध्ये कोणते राज्य आहे पुढे? घ्या जाणून
केंद्र सरकारच्याअग्निपथ योजनेला देशभरातून विरोध दर्शवला जात आहे. युपी, बिहार, तेलंगणा सारख्या राज्यांमध्ये या आदोंलनांना हिंसक वळण लागले आहे.
Web Title: Agneepath scheme protest more ruckus in up bihar and rajasthan know reasons dpj