भारतीय लष्करात जास्तीत जास्त तरुणांनी सामील व्हावे म्हणून केंद्र सरकारने अग्निपथ योजना (Agneepath Scheme)सुरू केली आहे. या योजनेची घोषणा २०२२ साली जून महिन्यात करण्यात आली. या योजनेंतर्गत निवड झालेल्या तरुणांना अग्निवीर म्हटले जाते. तरुणांना या योजनेंतर्गत लष्कारात ४ वर्षे सेवा देता येईल. मासिक वेतनाव्यतिरिक्त लष्करात चार वर्षे सेवा दिल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी म्हणून ११.७१ लाख रुपये देण्यात येतील.
अग्निपथ योजनेला प्रोत्साहन मिळावे म्हणून गुरुवारी (१२ जुलै) गृह मंत्रालयाने माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (सीएपीएफ) रिक्त पदांच्या भारतीसाठी…
तरुणांना अल्पावधीसाठी सैन्यदलात भरतीची संधी देणाऱ्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचारातील प्रमुख…