• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. landslide assam rain 81 dead over 50 lakh affected dpj

Photos : आसाममध्ये पुराचा हाहाकार; ८१ लोकांचा मृत्यू, तर ५० लाख लोकांना फटका

आसाममध्ये पुराने हाहाकार माजवला असून यात ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या काही भागात पाऊस सुरूच असल्याने, ३२ जिल्ह्यांतील ४५ लाखांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे.

June 23, 2022 16:36 IST
Follow Us
  • आसाममध्ये पुराने हाहाकार माजवला असून यात ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या काही भागात पाऊस सुरूच असल्याने, ३२ जिल्ह्यांतील ४५ लाखांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे.
    1/15

    नलबारी जिल्ह्यातील कमरकुची गावातील पूरग्रस्त भागातून सुरक्षित ठिकाणी जात असताना एक व्यक्ती आपल्या प्राण्यांना एका टबमध्ये घेऊन जाताना दिसत आहे. (पीटीआय फोटो)

  • 2/15

    आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या अहवालानुसार ५ हजारहून अधिक गावांमध्ये ४७,७२,१४० लोक प्रभावित झाले आहेत. राज्यातील विविध भागात २ लाखांहून अधिक लोक मदत छावण्यांमध्ये आहेत. छायाचित्रात. आसाममधील नलबारी जिल्ह्यातील पूरग्रस्त गावात सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी लोक केळीचा तराफा वापरताना दिसत आहेत, (पीटीआय फोटो)

  • 3/15

    नागाव जिल्ह्यात रविवार, १९ जून २०२२ रोजी अतिवृष्टीनंतर पूरग्रस्त भागातून ग्रामस्थ त्यांच्या सामानासह सुरक्षित स्थळी जात आहेत.

  • 4/15

    रविवारी, १९ जून २०२२ रोजी, मोरीगाव जिल्ह्यात, अतिवृष्टीनंतर पूरग्रस्त भागातून कंटेनरमध्ये पिण्याचे पाणी नेणारी एक महिला. (पीटीआय फोटो)

  • 5/15

    सिलचरमधील पूरग्रस्त भागातून लोक आपल्या कुटुंबाला घेऊन सुरक्षित स्थळी जात असताना (पीटीआय फोटो)

  • 6/15

    आसाममधील नागाव जिल्ह्यात रविवार, १९ जून २०२२ रोजी पूर आलेला रस्ता ओलांडण्यासाठी गावकरी केळीचा तराफा वापरतात. (पीटीआय फोटो)

  • 7/15

    बक्सा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरग्रस्त धमधामा-खाटीकुची जोड रस्त्याची पाहणी करताना स्थानिक

  • 8/15

    गुवाहाटीतील चंदनगिरी येथे मुसळधार पावसामुळे गुवाहाटी महानगरपालिकेच्या कार्यालयाची सीमा भिंत कोसळली.

  • 9/15

    भारतीय लष्कराच्या जवानांनी कामरूप जिल्ह्यातील कलिता कुची येथील पूरग्रस्त भागातून गावकऱ्यांची सुटका केली.

  • 10/15

    सिलचरमधील पूरग्रस्त भागातून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लोकांना सुरक्षा स्थळी हलवले.

  • 11/15

    कामरूप जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातून प्रवासी मार्ग काढताना. (PTI फोटो)

  • 12/15

    नागाव जिल्ह्यातील राहा गावात पूरग्रस्त ठिकाणी ये-जा करण्यासाठी गावकरी बोटीचा वापर करत आहेत.

  • 13/15

    नागाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरग्रस्त झालेल्या रस्त्याची पाहणी करताना स्थानिक

  • 14/15

    सिलचरमध्ये संततधार पाऊस सुरुच आहे. भर रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यातून नागरीकांना मार्ग काढावा लागत आहे.

  • 15/15

    आसाममधील कामरूप जिल्ह्यात एक मोटारसायकलस्वार पूरग्रस्त रस्त्यावरून जात आहे.

TOPICS
आसामAssamमराठी बातम्याMarathi News

Web Title: Landslide assam rain 81 dead over 50 lakh affected dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.