Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. serious seven allegations by shivsena mla nitin deshmukh who rescue from guwahati pbs

Photos : “कुणी माझे हात, कुणी पाय, कुणी मान, तर कुणी कंबर पकडली आणि…”; शिवसेना आमदाराने केलेले धक्कादायक ७ आरोप

शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केलेले धक्कादायक ७ आरोप.

June 23, 2022 21:30 IST
Follow Us
  • १. सुरतमध्ये पंचतारांकित हॉटेल होते. तिथे प्रचंड बंदोबस्त होता. मी महाराष्ट्रातही एवढा पोलीस बंदोबस्त पाहिला नाही. तेथे ३००-३५० पोलिसांचा फौजफाटा होता. अनेक आयपीएस अधिकारी तेथे भाजपाची गुलामगिरी करत होते - आमदार नितीन देशमुख
    1/7

    १. सुरतमध्ये पंचतारांकित हॉटेल होते. तिथे प्रचंड बंदोबस्त होता. मी महाराष्ट्रातही एवढा पोलीस बंदोबस्त पाहिला नाही. तेथे ३००-३५० पोलिसांचा फौजफाटा होता. अनेक आयपीएस अधिकारी तेथे भाजपाची गुलामगिरी करत होते – आमदार नितीन देशमुख

  • 2/7

    २. मी एकनाथ शिंदे यांच्याशी वाद करून निघालो. रस्त्याने चालत असताना माझ्यामागे १०० ते १५० पोलीस व गाड्यांचा ताफा होता. रात्री साडेबारा वाजता मी हॉटेलमधून निघालो. साडेबारा वाजल्यापासून तीनपर्यंत भरपावसात मी चालत होतो – आमदार नितीन देशमुख

  • 3/7

    ३. “माझ्यामागे पोलीस असल्याने मला रस्त्यावरील चालू वाहने नेत नव्हती. कुणीही गाडी थांबवत नव्हते. अखेर मला रात्री साडेतीन वाजता नेण्यासाठी महाराष्ट्रातून गाडी पाठवण्यात आली. त्याची माहिती मिळाल्यानंतर गुजरात पोलिसांनी मला उचलून लाल गाडीत टाकलं – आमदार नितीन देशमुख

  • 4/7

    ४. मला सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. मला शंका आली की रुग्णालयात का आणलं. मला कोणताही आजार नाही, मला शुगर नाही, ह्रदय विकाराचा आजार नाही त्यामुळे मला शंका निर्माण झाली – आमदार नितीन देशमुख

  • 5/7

    ५. “पोलीस आणि डॉक्टरांमधील संभाषणामुळे मला शंका निर्माण झाली. त्यांनी मला तुम्हाला ह्रदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं. मी तर एकदम तंदुरुस्त होतो. मी ६-७ जणांना माझ्या अंगाला हात लावू देत नव्हतो. त्यामुळे मला ह्रदयविकाराच झटका आल्याचा दावा केल्यानंतर माझा घातपात करण्याचं पोलिसांचं षडयंत्र असल्याचं माझ्या लक्षात आलं – आमदार नितीन देशमुख

  • 6/7

    ६. “मी सकाळी सहा साडेसहावाजेपर्यंत म्हणजे तीन तास माझ्या शरीराला हात लावू दिला नाही. त्यानंतर २०-२५ जणांनी मला पकडलं, कुणी कंबर पकडलं, कुणी माझे हात पकडले, कुणी माझे हात पकडले, कुणी मान पकडली आणि एकाने माझ्या दंडावर जोराने इंजेक्शन टोचलं. तेव्हा आपल्यामागे माझा मुलगा, मुलगी, पत्नी असल्याचा विचार करून मी घाबरलो आणि रडलो – आमदार नितीन देशमुख

  • 7/7

    ७. ह्रदयविकाराच्या नावाखाली आपला घातपात होणार आहे हे माझ्या लक्षात आलं. इंजेक्शन आल्यावर मला गुंगी आली आणि त्यानंतर मला अशा ठिकाणी नेलं जिथं एका खोलीत मला ठेवून ५० पोलीस तैनात होते. आयपीएस अधिकारी देखील होते. त्यामुळे यामागे भाजपा कसं कटकारस्थान रचत आहे हे मी प्रत्यक्ष पाहिलं – आमदार नितीन देशमुख (सर्व छायाचित्र सौजन्य – नरेंद्र वासकर, एक्स्प्रेस फोटो)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeभारतीय जनता पार्टीBJPशिवसेनाShiv Senaसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Serious seven allegations by shivsena mla nitin deshmukh who rescue from guwahati pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.