• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ashadhi ekadashi maharashtra sant dnyaneshwar palkhi lakhs of devotees warkaris crossing dive ghat pune alandi to pandharpur pilgrimage photos sdn

Photos: हरिभक्तीच्या हिरवाईत नटली, दिवे घाटातली नागमोडी वाट…

पुण्यामध्ये पहाटे माउलींची नित्यपूजा व आरती झाल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याने सासवडला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.

June 25, 2022 10:29 IST
Follow Us
  • Sant Dnyaneshwar Palkhi 2022 Dive Ghat Pune Photos
    1/21

    पुणे शहरातील दोन दिवसांच्या मुक्कामात चैतन्याची अनुभूती देऊन पुन्हा पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी दिवे घाटातील अवघड नागमोडी वाट हरिभक्तीच्या हिरवाईने नटली होती.

  • 2/21

    माउली संगतीला असल्याने वैष्णवांनी हा अवघड टप्पा लीलया पार केला.

  • 3/21

    रात्री आठच्या सुमारास पालखी सोहळा सासवड येथे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी दाखल झाला.

  • 4/21

    हरिभक्तीच्या हिरवाईत नटली, दिवे घाटातली नागमोडी वाट… पाहुनी मन हरखून गेले, माऊलींच्या पालखीचा थाट…

  • 5/21

    टाळ मृदंगाच्या तालावर ‘ज्ञानोबा माउ..तुकाराम…..’असा जयघोष करीत अवघड दिवेघाट पार केला.

  • 6/21

    पुण्यामध्ये पहाटे माउलींची नित्यपूजा व आरती झाल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याने सासवडला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.

  • 7/21

    पुणे ते सासवड हा ३० किलोमीटरचा टप्पा मोठा असल्याने पालखी सोहळा वेगात पुढे चालत होता.

  • 8/21

    सकाळी हडपसर येथे पालखी सोहळा पोहोचला, या वेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

  • 9/21

    वाटेत ठिकठिकाणी वारकऱ्यांना फराळाचे पदार्थ वाटण्यात आले.

  • 10/21

    पुणे ते दिवे घाटापर्यंत पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने पुणेकर सहभागी झाले होते.

  • 11/21

    माउलींचा हा सोहळा दुपारी दोन वाजता वडकीनाला येथे पोहोचला. तेथे वारकऱ्यांनी दुपारचा फराळ व विश्रांती घेतली.

  • 12/21

    विश्रांतीनंतर दुपारी ३.३० वाजता पालखी सोहळ्याने अवघड दिवे घाट चढण्यास सुरुवात केली.

  • 13/21

    दिवे घाट चढणे अवघड असल्याने माउलींच्या रथाला वडकी, फुरसुंगी येथील दोन बैलजोड्या जोडण्यात आल्या.

  • 14/21

    विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदंगाचा आवाज अशा भारावलेल्या वातावरणात वैष्णवांनी दिवेघाट चढण्यास सुरुवात केली.

  • 15/21

    अनेक दिंड्यांमध्ये टाळ-मृदंगाच्या तालावर निरनिराळे अभंग-गीते गायली जात होती, त्यामुळे साऱ्यांचाच उत्साह द्विगुणित होत होता.

  • 16/21

    ढगाळ वातावरण असल्याने हवेत गारवा होता. उन्हाचा त्रास जाणवला नाही.

  • 17/21

    करोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षे वारी घडली नव्हती, त्यामुळे वारी अनुभवायला मिळाल्याचे समाधान वैष्णवांच्या चेहऱ्यावर होते.

  • 18/21

    दिवे घाट हिरवाईने नटलेला आहे.

  • 19/21

    घाटातील डोंगरावर उभ्या केलेल्या भव्य विठुरायाच्या मूर्तीकडे पाहून वैष्णवांच्या आनंदाला उधाण आले.

  • 20/21

    घाट माथ्यावर हजारो भाविकांनी पालखी सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती.

  • 21/21

    (सर्व फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
आषाढी वारी २०२५Ashadhi Wari २०२५पुणे न्यूजPune Newsमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Ashadhi ekadashi maharashtra sant dnyaneshwar palkhi lakhs of devotees warkaris crossing dive ghat pune alandi to pandharpur pilgrimage photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.