• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photo story on samvidhan samata dindi warkari pandharpur wari pbs

Photos : ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’; संविधानातील मूल्यांचा प्रसार करत समता दिंडी पंढरपूरकडे रवाना

सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीचीच चर्चा आहे. हजारो कष्टकरी आपल्या शेतीची कामं बाजूला ठेऊन तन्मयतेने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने दिंडीत चालत आहेत. या दिंडी सोहळ्यात समता दिंडीचाही समावेश आहे.

June 28, 2022 21:05 IST
Follow Us
  • सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीचीच चर्चा आहे. हजारो कष्टकरी आपल्या शेतीची कामं बाजूला ठेऊन तन्मयतेने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने दिंडीत चालत आहेत. या दिंडी सोहळ्यात समता दिंडीचाही समावेश आहे.
    1/19

    सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीचीच चर्चा आहे. हजारो कष्टकरी आपल्या शेतीची कामं बाजूला ठेऊन तन्मयतेने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने दिंडीत चालत आहेत. या दिंडी सोहळ्यात समता दिंडीचाही समावेश आहे.

  • 2/19

    महाराष्ट्रातील सामाजिक, परिवर्तनवादी संस्था, संघटनांमधील कार्यकर्ते गेली १० वर्ष पंढरपूरच्या वारीत ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ असे म्हणत वारीत एक दिवस चालतात. यात महाराष्ट्रातील साहित्यिक, कलावंत, पत्रकार, संपादक, शिक्षक, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होतात.

  • 3/19

    यंदा लोकराजा शाहू महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे २६ जून २०२२ रोजी सासवड ते जेजुरी या १८ किलोमीटरच्या टप्प्यात माऊलीच्या पालखीसोबत ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांच्यासोबत ही एकदिवसीय वारी सुरू झाली.

  • 4/19

    सकाळी पुण्यातील महात्मा फुले यांच्या वाड्यात फुले यांना अभिवादन करून आणि संविधानातील प्रास्ताविकातील उद्धेशिकाचे वाचन करून संविधान समता दिंडीची सुरुवात करण्यात आली. यावेळी अविनाश पाटील, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर, शरद कदम, सचिन माळी, शीतल साठे, संदीप आखाडे आदी उपस्थित होते.

  • 5/19

    हडपसर, दिवेघाट या मार्गाने ही मंडळी सकाळी ८ वाजता सासवड येथे पोहचली. सासवडच्या अलिकडे पोलिसांच्या तपासणीनंतर ट्रॅफिक जाम, बसमधून खाली उतरून काही अंतर पायी चालत असा टप्पा पार करीत सारे सासवड एस. टी. स्थानकावर एकत्र जमले. इतर संस्था, संघटना यांचे कार्यकर्ते येथे एकत्र जमले होते. येथून शाहीर शीतल साठे यांच्या ‘चला, चला पंढरीला’ या गाण्याने पायी वारीला सुरुवात झाली.

  • 6/19

    एक दिवस तरी वारी अनुभवावीचा यंदाचा चेहरा हा तरुण मुलांचा आणि महिलांचा होता. दरवर्षी तरुण मुलांची आणि महिलांची संख्या वाढते आहे. सासवड ते जेजुरी हे अंतर चालत असताना कार्यकर्ते दिंडीत चालणाऱ्या अनेकांशी बोलत होते, समजून घेत होते. त्यांच्या अभंगामध्ये कोरस देत होते. खांद्यावर पताका नाचवत होते.

  • 7/19

    एक दिवस तरी वारी अनुभवावीचा यंदाचा चेहरा हा तरुण मुलांचा आणि महिलांचा होता. दरवर्षी तरुण मुलांची आणि महिलांची संख्या वाढते आहे. सासवड ते जेजुरी हे अंतर चालत असताना कार्यकर्ते दिंडीत चालणाऱ्या अनेकांशी बोलत होते, समजून घेत होते. त्यांच्या अभंगामध्ये कोरस देत होते. खांद्यावर पताका नाचवत होते.

  • 8/19

    दुपारी जेवणानंतर झालेल्या कार्यक्रमात सुभाष वारे, अविनाश पाटील यांनी एक दिवस तरी वारी अनुभवांनी आणि संविधान समता दिंडीच्या आयोजनाबाबत माहिती दिली.

  • 9/19

    अड्याळ टेकडी येथे कार्यरत असलेले ग्रामस्वराज्य अभियानाचे सुबोध दादा यांनी त्यांचे विचार मांडले आणि तुकडोजी महाराजांच्या कामाची माहिती दिली.

  • 10/19

    ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी वारीचा इतिहास सांगत संत पाप पुण्याच्या कल्पनेकडे कशा पद्धतीने पहात ते सांगितले.

  • 11/19

    संत परंपरेत पाच प्रमुख संत आहेत.ज्ञानोबाराया ,नामदेवराया , कबीर,एकनाथ महाराज आणि तुकोबाराय. या पाच संता मध्ये कबीराचे, वारकरी संप्रदायात फार मोठे महत्त्व आहे.पूर्वी काशी हून कबीरांची पालखी पंढरपूरला यायची त्यांच्या पालखीत पांढरे निशाण असायचे असे ही त्यांनी सांगितले.

  • 12/19

    ह.भ.प. श्याम सुंदर महाराज सोन्नर यांनी एक दिवस वारीची कल्पना विषद करताना संत विचार आणि संविधान एकमेकाशी कसे परस्पर पूरक आहेत ते संताच्या अभंगाचा दाखला देत सांगितले.

  • 13/19

    स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या मूल्याची त्यांनी संत विचाराशी घट्ट वीण असल्याचे उदाहरणासह सांगितले.

  • 14/19

    दिंडीत संविधानिक मूल्यविचारांना पूरक असे संतांचे अभंग, संविधानाविषयीचे अभंग आणि गाणी गात अनेकजण पंढरपूरपर्यंत चालणार आहेत.

  • 15/19

    आता ही संविधान समता दिंडी संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातून १० जुलैपर्यंत पंढरपूरला पोचणार आहे.

  • 16/19

    संविधानप्रेमी आणि परिवर्तनवादी समविचारी नागरिकांनी शक्य तिथे या दिंडीत सहभागी होऊन या सोहळ्याचा आनंद घेत संविधानाच्या प्रबोधन मोहिमेत सहभागी व्हावं, असे आवाहन ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी यावेळी केले.

  • 17/19

    कार्यक्रमाचा समारोप लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करणारे गीत शीतल साठे यांनी सादर केले.

  • 18/19

    आभार श्रीकांत लक्ष्मी शंकर यांनी केले. संविधान समता दिंडी रात्री तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रवाना झाली.

  • 19/19

    मुंबईहून राष्ट्र सेवा दलाचे शरद कदम, हर्षदा भालेकर, मनोज खराडे, यांच्या सोबत जनता दलाचे रवि भिलाणे, अंनिसचे विजय परब, मालवणच्या नाथ पै सेवांगणाचे नितीन वाळके, बने परिवाराचे महेश बने, सामाजिक कार्यकर्ता सावित्री मुंढे, उद्योजक अजय कदम, प्रदीप मयेकर, अतुल साटम, मिलिंद यादव, किशोर लाड, गणेश क्षीरसागर, पुण्याहून राष्ट्र सेवा दलाचे दत्ता पाकिरे, प्रकाश कदम, शिवराज सूर्यवंशी, विनोद बाफना, उद्योजक सुनील अंबिके, गांधी विचाराचा तरुण प्रसारक संकेत मुनोत, अंनिसचे विशाल विमल, संविधान अभ्यासक सुभाष वारे, साताराहून लेक लाडकी अभियानाच्या ॲड. वर्षा देशपांडे, प्रा. संजीव बोंडे, शॉर्ट फिल्मच्या क्षेत्रातील कैलास जाधव, माया पवार, रूपा मुळे, स्वाती बल्लाळ, सुमन पवार, जयश्री खुळे, सिंधुताई लोहार, अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील, बीडहून आलेले मनोहर जायभाये, राष्ट्र सेवा दलाचे मिरजहून आलेले सदाशिव मगदूम, संगमनेरहून आलेले राजाभाऊ अवसक, चांगल्या आरोग्य सुविधा सर्वांना मिळाव्यात म्हणून काम करणारे पत्रकार दीपक जाधव, लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राचे सुनील स्वामी, राजवैभव शोभा रामचंद्र, रेश्मा खाडे, शीतल यशोधरा, शर्मिला जोशी, सौरभ बगाडे, आम्रपाली जाधव, सतीश घावटेमर्दान, कल्याणहून आलेले पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र डुंबरे, सेवा दलाचे बाजीराव खुळे, सिध्दी राऊत, ‘डियर तुकोबा’ या पुस्तकाचे लेखक विनायक होगाडे, नवयान जलशाचे सचिन माळी, शीतल साठे आणि त्यांची टीम, संदीप आखाडेसोबत आलेली संविधान प्रचारकांची टीम, सासवडचे योगेश धोंडे, श्रीकांत लक्ष्मी शंकर, कविता जगताप, सायली कामथे, सूरज गदादे, लातूरहून आलेले हनुमंत मुंढे, आनंदवनहून आलेल्या सारिका सौसागडे, तुकडोजी महाराज यांचे अड्याळ टेकडी येथे कार्यरत ‘ग्राम स्वराज्य’ अभियानाचे सुबोध, एस.एम. जोशी फाउंडेशनचे उपेंद्र टण्णू आदींसह असंख्य कार्यकर्ते या वारीत सहभागी झाले.

TOPICS
आषाढी वारी २०२५Ashadhi Wari २०२५पंढरपूरPandharpurवारकरीWarkari

Web Title: Photo story on samvidhan samata dindi warkari pandharpur wari pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.