• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. know what happens about oath ceremony of cm eknath shinde deputy cm devendra fadnavis in mumbai pbs

Photos : धक्कातंत्र! आधी अचानक एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदी वर्णी, नंतर ऐनवेळी फडणवीस उपमुख्यमंत्री, नेमकं काय घडलं?

राज्याच्या राजकारणात गुरुवार (३० जून) धक्कातंत्राचा दिवस ठरला. आधी मुख्यमंत्रीपदाची घोषणा आणि नंतर ऐनवेळी उपमुख्यमंत्रीपदाची घोषणा हे दोन मोठे धक्के मानले जात आहेत.

June 30, 2022 23:08 IST
Follow Us
  • राज्याच्या राजकारणात गुरुवार (३० जून) धक्कातंत्राचा दिवस ठरला.
    1/21

    राज्याच्या राजकारणात गुरुवार (३० जून) धक्कातंत्राचा दिवस ठरला.

  • 2/21

    आधी असा अंदाज लावण्यात आला की भाजपा आणि शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे गट एकत्र येऊन सरकार स्थापन करतील.

  • 3/21

    यात सर्वात मोठा पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

  • 4/21

    मात्र, राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी पहिला धक्का दिला.

  • 5/21

    भाजपा एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देईल. या नव्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. यासह मागील अनेक दिवसांपासूनचे सर्व अंदाज फोल ठरले.

  • 6/21

    विशेष म्हणजे फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची निवड जाहीर करताना आपण सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असंही स्पष्टपणे सांगितलं.

  • 7/21

    मी सरकारमध्ये सहभागी नसेल, पण माझा सरकारला पूर्ण पाठिंबा असेल. सरकार व्यवस्थित चालण्यासाठी माझं पूर्ण सहकार्य असेल, असं फडणवीस यांनी सांगितलं.

  • 8/21

    यावेळी फडणवीस यांनी आत्ता केवळ एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल आणि काही दिवसांमध्येच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असंही नमूद केलं.

  • 9/21

    बाहेर पाऊस असल्याने आणि कुणालाही निमंत्रण देणे शक्य नसल्याने हा शपथविधी अगदी थोडक्यात होईल आणि कोणत्याही कार्यकर्त्यांना प्रवेश नसेल असं सांगत देवेंद्र फडणवीस सर्व कार्यकर्त्यांची माफीही मागितली.

  • 10/21

    यानंतर राजभवनमध्ये शपथविधीसाठीच्या तयारीची लगबग सुरू झाली. मंचावर राज्यपाल आणि शपथ घेणाऱ्या भावी मुख्यमंत्र्यांसाठी अशा दोन खुर्ची ठेवण्यात आल्या.

  • 11/21

    मात्र, याच काळात राजकीय घडामोडींना वेग आला आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी वृत्तसंस्था एएनआयला प्रतिक्रिया दिली.

  • 12/21

    या प्रतिक्रियेत नड्डा यांनी केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची सूचना केल्याची माहिती दिली.

  • 13/21

    विशेष म्हणजे या नंतर लगेचच भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी जे. पी. नड्डा यांची विनंतीला मान देऊन सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं.

  • 14/21

    यानंतर राज्याच्या राजकारणात एकाच दिवशी दुसरा धक्का बसला. सर्वच स्तरातून या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.

  • 15/21

    देवेंद्र फडणवीस यांनी आधी सरकार बाहेर राहण्याचा निर्णय जाहीर केला असताना अचानक सरकारमध्ये सहभागी कसे झाले असाही प्रश्न विचारण्यात आला.

  • 16/21

    यानंतर नव्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोनदा फोनवरून चर्चा केली.

  • 17/21

    तसेच मोदींनी फडणवीसांना सरकारमध्ये सहभागी होण्याचे आदेश दिल्याचंही बोललं गेलं.

  • 18/21

    शरद पवार यांनी देखील एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड व देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं.

  • 19/21

    आम्हाला कुणालाही या निर्णयांची कल्पना नव्हती असंही शरद पवार यांनी नमूद केलं.

  • 20/21

    यावेळी शरद पवार यांनी भाजपात दिल्ली व नागपूर येथून येणारे आदेश फार महत्त्वाचे असतात. ते तंतोतंत पाळावे लागतात, असं सांगितलं.

  • 21/21

    तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मुख्यमंत्री नंतरच्या काळात मंत्री झाले, मात्र, हे पहिले मुख्यमंत्री आहेत, जे उपमुख्यमंत्री झाले, असंही नमूद केलं. (सर्व फोटो सोशल मीडिया)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisभारतीय जनता पार्टीBJPशिवसेनाShiv Sena

Web Title: Know what happens about oath ceremony of cm eknath shinde deputy cm devendra fadnavis in mumbai pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.