Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra floor test deputy cm devendra fadnavis praises cm eknath shinde scsg

Photos: कट्टर शिवसैनिक ते ४० दिवसांचा तुरुंगवास; फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक करताना विधानसभेत मांडलेले १० मुद्दे

शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव १६४ विरुद्ध ९९ मतांनी जिंकल्यानंतर फडणवीसांनी दिलं भाषण

July 4, 2022 12:43 IST
Follow Us
  • Maharashtra Floor Test Deputy Cm devendra fadnavis praises CM Eknath Shinde
    1/18

    शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

  • 2/18

    १६४ विरुद्ध ९९ मतांनी शिंदेंनी हा ठराव जिंकलाय.

  • 3/18

    शिंदे यांच्या विजयानंतर सभागृहामध्ये बोलाताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला.

  • 4/18

    यावेळी फडणवीस यांनी शिंदे यांचा उल्लेख करताना ‘शिवसेना भाजपा युतीचे मुख्यमंत्री’ असा केला.

  • 5/18

    यानंतर भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांनी, ‘शिवसेना भाजपा युतीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या.

  • 6/18

    “एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला म्हणून शिंदेंचं मनापासून अभिनंदन करतो,” असं म्हणत फडणवीसांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

  • 7/18

    “ज्या सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं त्यांचे अभार तर मानतोच पण ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे प्रचंड मतांनीनी पारित व्हावा यासाठी बाहेर राहून मदत केली त्यांचेही आभार मानतो,” असं फडणवीस यांनी म्हटलं. त्यानंतर सत्ताधारी आमदारांनी बाकं वाजवून या वक्तव्यावर आनंद व्यक्त केला.

  • 8/18

    अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दीकी, धीरज देशमुख हे नेते आज विश्वास दर्शक ठरावाच्या दिवशी सभागृहात अनुपस्थित होते. सभागृह ११ वाजता सुरु झालं. पण काँग्रेसचे चार सदस्य उशिरा आले. सभागृहामध्ये प्रवेश देण्याची वेळ संपल्याने त्यांना सभागृहात प्रवेश देण्यात आला नाही आणि शिंदे सरकारच्या विरोधात विरोधकांची केवळ ९९ मतं पडली.

  • 9/18

    अनेक सदस्य अनुपस्थित असल्याने विरोधी बाकांवरील आमदारांची विश्वासदर्शक ठरावातील संख्या तिहेरी आकड्यापर्यंतही पोहचू शकली नाही.

  • 10/18

    “एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक, बाळासाहेबांच्या जाजवल्य विचारांचे पाईक आहेत,” असंही फडणवीस म्हणाले.

  • 11/18

    “ते एक कुशल संघटक आणि जनतेचे सेवेकरी आहेत. १९८० पासून शाखाप्रमुख ते पुढे येत वेगवेगळी पदं भुषवली आहेत,” असंही फडणवीसांनी म्हटलं.

  • 12/18

    “१९८४ मध्ये किसननगर शाखाप्रमुख दिघेसाहेबांच्या नेतृत्वात अनेक आंदोलनात सहभाग घेतला,” असं फडणवीसांनी सांगितलं.

  • “दिघेसाहेबांनी आदेश दिला की आपलं सर्वस्व सोडून, आपल्या जीवाची पर्वा न करता ते गरजवंतांसाठी ते हजर असायचे,” असं फडणवीस म्हणाले.
  • 13/18

    “अडचणीच्या काळात छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रशासनाविरोधात आंदोलन उभं करुन सामान्यांना न्याय देण्यासाठी ते लढले,” असं फडणवीस पुढे शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव करताना म्हणाले.

  • 14/18

    “२००४ पासून सलग चार वेळा ते महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले. मागच्या काळात मंत्री म्हणून त्यांनी काम केलं,” असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

  • 15/18

    पुढे बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी, “त्याहून महत्वाचं म्हणजे त्या काळात सीमाप्रश्नावर जे काही आंदोलन झालं त्या आक्रमक आंदोलनात एक नेता म्हणून दबदबा निर्माण केला,” असं म्हटलं.

  • 16/18

    “१९८६ साली त्यांनी सीमाप्रश्नावरील आंदोलनामध्ये सक्रीय सहभाग घेतला. ४० दिवस बेल्लारीच्या तुरुंगात सीमाप्रश्नासंदर्भात कारावास भोगला आणि त्यातून एक मोठं व्यक्तीमत्व तयार झालं,” असं त्यांनी सांगितलं.

  • 17/18

    “१९९७ साली ठाण्यात नगसेवक, मनपा सभागृह नेते, आमदार, जिल्हाप्रमुख झाले. आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत,” असं फडणवीस म्हणाले. (फाइल फोटो)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavis

Web Title: Maharashtra floor test deputy cm devendra fadnavis praises cm eknath shinde scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.