• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. this former chief minister has had two marriages lije panjab cm bhagwant mann dpj

घटस्फोटाच्या ७ वर्षानंतर भगवंत मान दुसऱ्यांदा बनले नवरदेव; ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांनीही केली आहेत दोन लग्न

punjab cm bhagwant mann wedding मार्च २०२२ मध्ये भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री झाले. यादरम्यान त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये आपली पहिली पत्नी आणि मुलांचा उल्लेखही केला होता.

July 7, 2022 19:04 IST
Follow Us
  • पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरप्रीत कौरसोबत दुसरे लग्न केले. याआधी भगवंत मान यांचे लग्न इंद्रप्रीत कौरशी झाले होते, ज्यांच्यापासून त्यांचा २०१५ मध्ये घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर सात वर्षांनी मान यांनी दुसरे लग्न केले.
    1/9

    पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरप्रीत कौरसोबत दुसरे लग्न केले. याआधी भगवंत मान यांचे लग्न इंद्रप्रीत कौरशी झाले होते, ज्यांच्यापासून त्यांचा २०१५ मध्ये घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर सात वर्षांनी मान यांनी दुसरे लग्न केले.

  • 2/9

    भगवंत मान यांची दुसरी पत्नी गुरप्रीत कौर डॉक्टर आहेत. त्या मान कुटुंबीयांच्या निकटवर्ती असल्याचं बोललं जातं.

  • 3/9

    मोजक्या लोकांच्या उपस्थितीत भगवंत मान यांचा विवाह सोहळा पार पडला. भगवंत मान यांच्या विवाहाला अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचे प्रवक्ते राघव चड्डा उपस्थित होते.

  • 4/9

    मुख्यमंत्र्यांनी दोन लग्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या नेत्यांनी दोन लग्ने केली आहेत.

  • 5/9

    उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनीही दोन लग्ने केली आहेत. पहिल्या पत्नीचे नाव मालती देवी आणि दुसऱ्या पत्नीचे नाव साधना गुप्ता आहे. साधना गुप्ता या सपा कार्यकर्त्या होत्या.

  • 6/9

    मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनीही दोन लग्ने केली आहेत. त्यांची पहिली पत्नी आशा देवी यांचे २०१३ मध्ये निधन झाले. यानंतर २०१५ मध्ये दिग्विजय सिंह यांनी पत्रकार अमृता रायसोबत लग्न केले.

  • 7/9

    कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनीही दोन विवाह केले होते. पहिल्या पत्नीचे नाव अनिता, तर दुसऱ्या पत्नीचे नाव राधिका असून ती व्यवसायाने अभिनेत्री आहे.

  • 8/9

    दोनदा लग्न करणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनडी तिवारी यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांनी पहिले लग्न १९५३ मध्ये सुशीला संवाल यांच्याशी केले. त्याचवेळी दुसरे लग्न २०१४ मध्ये उज्ज्वला शर्मासोबत केले होते.

  • 9/9

    साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचे आजोबा आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांनीही दोन लग्न केले होते.

TOPICS
भगवंत मानBhagwant Mann

Web Title: This former chief minister has had two marriages lije panjab cm bhagwant mann dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.