• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra assembly cm eknath shinde deputy cm devendra fadnavis bjp rebel shiv sena mla cabinet expansion minister photos sdn

Photos: मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिंदे गटात नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता; जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील ४० आमदारांनी पाठिंबा दिला. त्यात शिवसेनेच्या सात मंत्र्यांचा समावेश होता.

Updated: August 9, 2022 09:33 IST
Follow Us
  • Eknath Shinde Devendra Fadnavis Shiv Sena BJP Cabinet Expansion
    1/30

    शिवसेनेच्या विरोधातील बंडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या बहुसंख्य आमदारांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत.

  • 2/30

    मंत्रीपदाच्या आशेनेच काही आमदारांनी शिंदे गटात उडी घेतली होती.

  • 3/30

    शिंदे यांना साथ देणाऱ्या अपक्षांच्या अपेक्षांचे ओझेही त्यांच्यावर आहे.

  • 4/30

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील ४० आमदारांनी पाठिंबा दिला.

  • 5/30

    त्यात शिवसेनेच्या सात मंत्र्यांचा समावेश होता.

  • 6/30

    शिंदे गटात प्रवेश करताना या मंत्र्यांनी आपल्याला पुन्हा मंत्रिपद मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली होती व त्यानुसार शिंदे यांनी त्यांना आश्वासन दिल्याचे समजते.

  • 7/30

    एकनाथ शिंदे यांच्यासह संदीपान भुमरे, दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार आणि शंभूराज देसाई या सात माजी मंत्र्यांनी शिंदे यांना साथ दिली होती.

  • 8/30

    भाजपबरोबर युतीत शिंदे गटाला किती मंत्रिपदे येतात हे अद्याप तरी जाहीर झालेले नाही.

  • 9/30

    मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात याबाबत चर्चा झाली असावी.

  • 10/30

    कदाचित शिंदे व फडणवीस यांच्या नवी दिल्ली भेटीनंतर मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटपावर शिक्कामोर्तब केले जाईल.

  • 11/30

    शिंदे गटातील बहुतांशी आमदारांना आपण मंत्री व्हावे असे वाटत असल्याने युतीत जास्तीत जास्त मंत्रिपदे मिळावीत, असा शिंदे यांचा प्रयत्न असेल.

  • 12/30

    पण मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे असल्याने जास्तीत जास्त मंत्रिपदे घेण्यावर भाजपचा भर असेल.

  • 13/30

    उद्धव ठाकरे सरकारमधील नऊ जणांनी शिंदे यांना साथ दिली.

  • 14/30

    त्यातील सात शिवसेनेचे तर बच्चू कडू आणि राजेंद्र येड्रावकर हे अपक्ष आहेत.

  • 15/30

    या नऊ जणांना पुन्हा संधी दिल्यास शिंदे गटातील किती जणांना संधी मिळते हा प्रश्न आहेच.

  • 16/30

    शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांनाही मंत्रिपदाची अपेक्षा आहे.

  • 17/30

    शिंदे यांच्या ठाण्यातील एक आमदार मंत्रीपदासाठी प्रयत्नशील आहे.

  • 18/30

    मराठवाड्यातील दोघांना मंत्रीपद मिळावे, असे वाटते.

  • 19/30

    रायगडमधील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी शिंदे यांना साथ दिली.

  • 20/30

    भरत गोगावले हे आता मुख्य प्रतोद आहेत.

  • 21/30

    यामुळे गोगावले यांना संधी मिळू शकते.

  • 22/30

    कोकणातील उदय सामंत यांनी शिंदे यांना साथ दिली. त्यांनाही मंत्रीपद कायम राहावे ही अपेक्षा आहे.

  • 23/30

    दीपक केसरकर यांनी शिंदे गटाची बाजू सत्तानाट्याच्या काळात प्रभावीपणे मांडली. त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

  • 24/30

    उत्तर महाराष्ट्रातून गुलाबराव पाटील यांचे मंत्रीपद नक्की मानले जाते.

  • 25/30

    किती मंत्रीपदे वाट्याला येतात यावरच शिंदे गटाचे सारे गणित अवलंबून असेल.

  • 26/30

    मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिंदे गटातही नाराजीचे सूर उमटू शकतात.

  • 27/30

    यातूनच मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सरकार कोसळण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली होती.

  • 28/30

    अंतर्गत मतभेदातून हे सरकार टिकणार नाही, असे भाकीत पवार यांनी व्यक्त केले होते.

  • 29/30

    (सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)

  • 30/30

    (हेही पाहा : डोक्यावर पाऊस अन् डोळ्यात पाणी…; मुख्यमंत्री शिंदेंची आंबेडकर, बाळासाहेब, दिघे स्मृतीस्थळाला भेट)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमहाराष्ट्रMaharashtraशिवसेनाShiv Sena

Web Title: Maharashtra assembly cm eknath shinde deputy cm devendra fadnavis bjp rebel shiv sena mla cabinet expansion minister photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.