• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos heroin worth rs 376 crores from mundra port in kutch gujrat scsg

Photos: अदानींच्या मुंद्रा बंदराजवळ सापडलं ३७६ कोटींचं हेरॉइन; कंटेनरमध्ये अमली पदार्थ लपवण्यासाठी तस्करांनी काय केलेलं पाहा

तीन हजार किलो अमली पदार्थ याच बंदरावरुन १५ सप्टेंबर २०२१ रोजी पकडले गेले होते

July 13, 2022 09:07 IST
Follow Us
    Photos heroin worth Rs 376 crores from Mundra port in Kutch Gujrat
    गुजरात पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ७५.३ किलो हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे. कच्छ जिल्ह्यामध्ये अदानी समुहाच्या मलकीच्या मुंद्रा बंदराजवळ आढळून आलेल्या एका कंटेनरमध्ये ३७६ कोटी ५० लाख रुपये किंमतीचे हे अमली पदार्थ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
  • 1/7

    गुजरात एटीएस आणि पंजाब पोलीस दलातील पोलीस उपनिरिक्षकांनी मुद्रा बंदरावरील एका कंटेरनमध्ये संशयास्पद वस्तू असल्याच्या शक्यतेने केलेल्या छापेमारीमध्ये हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती गुजरात पोलिसांचे डीजीपी आशिष भाटिया यांनी सांगितलं आहे.

  • 2/7

    हा सर्व माल १३ मे रोजी मुंद्रा बंदरामध्ये दाखल झाल्याची माहिती डीजीपी आशिष भाटिया यांनी दिली आहे.

  • 3/7

    संयुक्त अरब अमिरातीमधील अजमान फ्री झोनमधून हा माल मुंद्रा बंदरामध्ये आणण्यात आल्याची माहिती समोर आलीय. हा माल पंजाबमध्ये पाठवण्यात येणार होता.

  • 4/7

    या कंटेरनमधील अमली पदार्थ लपवण्यासाठी कार्डबोर्डचे पाईप वापरण्यात आले होते. हे पाईप कार्डबोर्डचे वाटू नयेत म्हणून त्यावर निळ्या रंगाचं प्लास्टिक लावून हेरॉइन लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असं पोलिसांनी सांगितलंय.

  • 5/7

    पोलीस अधिकाऱ्यांनी हे पाईप नीट तपासले असता त्यांना हे पाईप प्लास्टिकचे नसून कार्डबोर्डचे असल्याचं समजलं. या पाईपच्या दोन्ही बाजूंना प्लास्टिकचे बोळे कोंबण्यात आल्याने यामध्ये काहीतरी लपवल्याची शंका पोलिसांना आली. त्यानंतर त्यांनी ते बोळे काढले असता या पाईपमधून हेरॉइनची तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली.

  • 6/7

    गुजरातमधील याच बंदरावरुन १५ सप्टेंबर २०२१ रोजी तीन हजार किलो अमली पदार्थ पकडले गेले होते. त्यावेळीही हे बंदर आणि या बंदराची मालकी असणारा अदानी समूह चांगलाच चर्चेत आला होता.

TOPICS
गुजरातGujaratहेरॉईन ड्रग्जची तस्करीHeroin Drugs Smuggling

Web Title: Photos heroin worth rs 376 crores from mundra port in kutch gujrat scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.