-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंडच्या दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी 16,800 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन केले. त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात पीएम मोदींनी देवघरमध्ये रोड शो केला. रोड शोनंतर पंतप्रधानांनी बाबा बैद्यनाथ यांच्या धाममध्ये पुजा केली.
-
पुजेनंतर पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केले. यावेळी झालेल्या रोड शोमध्ये पंतप्रधानांचा ताफा जात असताना रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी होती.
-
यावेळी अनेकांनी भगवे कपडे घातले होते. मोदींनी हात जोडून नागरिकांना अभिवादन केले.
-
सरकारच्या नव्या योजनांमुळे उद्योगांना चालना मिळणार असल्याचे प्रतिक्रिया त्यांनी दिली. हे सर्व बाबांच्या आशीर्वादाने शक्य झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.
-
एकीकडे बाबांचा आशीर्वाद आणि दुसरीकडे जनता जनार्दनचा आशीर्वाद मिळाल्याचे पंतप्रधान म्हणाले.
-
झारखंडच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांच्या योजनाही बाबा आणि जनता जनार्दनच्या चरणी अर्पण केली, असेही मोदी म्हणाले.
-
आधीच्या सरकारांमध्ये योजना जाहीर झाल्या. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
-
बाबा बैद्यनाथ धाम, काशी विश्वनाथ धाम, केदारनाथ धाम, अयोध्या धाम, रामायण सर्किट, भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र स्थाने असो, देशातील श्रद्धा, अध्यात्म आणि ऐतिहासिक ठिकाणी आधुनिक सुविधा तयार केल्या जात आहेत, असेही ते म्हणाले.
-
भारत ही श्रद्धा, अध्यात्म आणि तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्रांनी आपल्याला एक चांगला समाज आणि एक चांगले राष्ट्र म्हणून आकार दिला आहे. फक्त देवघर पाहिलं तर येथे ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ दोन्ही आहेत.
PM Modi Deoghar Visit Photo : पंतप्रधान मोदींचा झारखंड दौरा, रोड शोसह केली बाबा बैद्यनाथ मंदिरात पूजा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंडच्या दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी 16,800 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन केले.
Web Title: Pm modi road show during visit to deoghar in jharkhand spb