• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. president election opposition candidate yashwant sinha was an ias officer know about his political journey photos kak

Photos : IAS अधिकारी, भाजपा प्रवक्ता ते केंद्रीय मंत्री…राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याबद्दल जाणून घ्या

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत.

July 14, 2022 12:48 IST
Follow Us
  • president election
    1/21

    देशात १८ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे.

  • 2/21

    भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्यात आली आहे.

  • 3/21

    तर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत.

  • 4/21

    राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यास काश्मीर प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देण्यासोबतच सीएए कायद्याबद्दलही सिन्हा यांनी वक्तव्य केले आहे.

  • 5/21

    राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून उमेदवारी मिळालेल्या यशवंत सिन्हा यांच्याबद्दल जाणून घेऊया.

  • 6/21

    यशवंत सिन्हा यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९३७ रोजी बिहारमधील पाटणा येथील कायस्थ कुटुंबात झाला.

  • 7/21

    त्यांनी राज्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. पाटणा विद्यापीठात त्यांनी राज्यशास्त्राचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे.

  • 8/21

    राजकारणात येण्यापूर्वी सिन्हा हे आयएएस अधिकारी होते. २४ वर्षे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केल्यानंतर १९८४ मध्ये त्यांनी केंद्रीय सेवेचा राजीनामा दिला.

  • 9/21

    त्यानंतर त्यांनी जनता दलात प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

  • 10/21

    १९८६ मध्ये सिन्हा जनता दलाचे महासचिव होते. १९८८ मध्ये ते राज्यसभेवर निवडूण गेले.

  • 11/21

    सिन्हा तीन वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडूण गेले आहेत.

  • 12/21

    १९९२ मध्ये सिन्हा यांनी भाजपात प्रवेश केला. ते भाजपाचे प्रवक्तेही राहिले आहेत.

  • 13/21

    माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिले आहे.

  • 14/21

    २००२ ते २००४ या कालावधीत ते देशाचे परराष्ट्र मंत्री होते.

  • 15/21

    २०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यावर सिन्हा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.

  • 16/21

    मोदीविरोधामुळे सिन्हा यांना भाजपाला सोडचिठ्ठी द्यावी लागली.

  • 17/21

    २०२१ मध्ये सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते पक्षाचे उपाध्यक्ष होते.

  • 18/21

    आता राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षांकडून उमेदवारी मिळाल्यानंतर यशवंत सिन्हा चर्चेत आले आहेत.

  • 19/21

    राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

  • 20/21

    (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस, यशवंत सिन्हा/ ट्विटर)

  • 21/21

    (हेही पाहा: देशाला मिळणार पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती?; जाणून घ्या द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल)

TOPICS
नॅशनल न्यूजNational Newsयशवंत सिन्हाYashwant Sinhaराष्ट्रपती निवडणूकPresidential Election

Web Title: President election opposition candidate yashwant sinha was an ias officer know about his political journey photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.