scorecardresearch

यशवंत सिन्हा

यशवंत सिन्हा देशाची माजी अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री आहेत. त्यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला. त्यांनी १९६० मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (आय.ए.एस) प्रवेश केला. ते १९८४ पर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेत होते. त्यानंतर त्यांनी सेवेचा राजीनामा देऊन जनता पक्षात प्रवेश केला. १९८६ मध्ये त्यांची जनता पक्षाचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली. १९८८ मध्ये जनता दलाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला. तसेच त्याच वर्षी ते राज्यसभेवर निवडून गेले. १९९० मध्ये जनता दलात फूट पडल्यानंतर त्यांनी चंद्रशेखर यांच्या समाजवादी जनता दलात प्रवेश केला. चंद्रशेखर यांच्या मंत्रीमंडळात ते अर्थमंत्री होते. १९९३ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. १९९५-१९९६ या काळात ते बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. १९९८, १९९९ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये त्यांनी झारखंड राज्यातील हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळातही त्यांनी अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री म्हणून काम केले. जून २००९ मध्ये १५ व्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या भाजपाच्या पराभवाला पक्षाच्या केंद्रिय नेतृत्वाला जबाबदार धरत त्यांनी पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. २१ एप्रिल २००८ रोजी त्यांनी भाजपालाच सोडचिट्ठी दिली. मार्च २०२१ मध्ये यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र, जून २०२२ मध्ये त्यांनी तृणमूल पक्षालाही सोडचिट्ठी दिली. २०२२ च्या राष्ट्रपती निवडणुकीत ते सत्ताधारी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांच्याविरोधात विरोधकांचे उमेदवार होते. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला.Read More
Presidential polls : 126 MLA and 17 MP from opposition parties cross voted for Draupadi Murmu
Presidential polls : विरोधी पक्षातील १२६ आमदार आणि १७ खासदारांनी पक्षादेश झुगारत द्रौपदी मुर्मू यांना केले मतदान

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अपेक्षापेक्षा काही मते जास्त मुर्मू यांना मिळाल्याचे, विरोधी पक्षातील काही खासदार आणि आमदारांनी मते दिल्याचे स्पष्ट झालं आहे.

21 Photos
Photos : IAS अधिकारी, भाजपा प्रवक्ता ते केंद्रीय मंत्री…राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याबद्दल जाणून घ्या

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत.

Yashwant Sinha Uddhav Thackeray
Presidential Election: उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर यशवंत सिन्हा यांचं मोठं विधान; म्हणाले…

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांच्या जागी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे

yashwant sinha
“राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यास काश्मीर प्रश्न सोडवण्याला प्राधान्य असेल”, यशवंत सिन्हा यांची प्रतिक्रिया

१८ जुलै २०२२ रोजी देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. यशवंत सिंन्हा यांच्या विरोधात भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची…

Telangana KCR Yashwant Sinha Narendra Modi
Airport Politics: तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधान मोदींऐवजी यशवंत सिन्हांना प्राधान्य; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंध बिघडल्याचं वारंवार समोर येतंय.

“The Kashmir Files पाहण्यासाठी संसदेत कायदा करा, न बघणाऱ्यांना तुरुंगात…;” TMC नेत्याची मागणी

काश्मीर फाइल्स हा चित्रपट संपूर्ण भारतात करमुक्त करणं पुरेसं नाही, असंही ते म्हणाले.

Sharad Pawar call meet, united opposition, atul bhatkhalkar, sanjay Raut
‘शोले’चा रिमेक करण्याचा विचार आहे म्हणे…; शरद पवार, संजय राऊतांवर भातखळकरांनी साधला निशाणा

शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीवरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी…

Yashwant Sinha , atalbihari vajpeyi , separatists, Jammu kashmir, bypoll, Election, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
‘आप’च्या अर्थसंकल्पाला भाजपच्या यशवंत सिन्हांचा हातभार!

सध्याच्या काळात ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती ‘ब्रेन डेड’ म्हणून घोषित केल्याचे त्यांनी म्हटले होते

सिन्हा यांचा मोदींवर थेट हल्ला

ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आणीबाणी लागू होण्याची शक्यता असल्याचे भाष्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लक्ष्य’ केले असताना…

संबंधित बातम्या

मराठी कथा ×