• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos of gas cylinder blast in house at kalyan dombivali pbs

Photos : पहाटे पुजेसाठी अगरबत्ती पेटवली आणि गॅस सिलेंडरचा स्फोट; कल्याणमधील हादरवणाऱ्या घटनेचे फोटो पाहा…

कल्याणमध्ये पुजेसाठी अगरबत्ती पेटवल्याने गॅस सिलेंडरच्या स्फोटाची घटना घडली. या स्फोटात एक ६५ वर्षीय व्यक्ती गंभीररीत्या भाजली आहे.

July 17, 2022 19:31 IST
Follow Us
  • कल्याणमध्ये पुजेसाठी अगरबत्ती पेटवल्याने गॅस सिलेंडरच्या स्फोटाची घटना घडली. या स्फोटात एक ६५ वर्षीय व्यक्ती गंभीररीत्या भाजली आहे.
    1/10

    कल्याणमध्ये पुजेसाठी अगरबत्ती पेटवल्याने गॅस सिलेंडरच्या स्फोटाची घटना घडली. या स्फोटात एक ६५ वर्षीय व्यक्ती गंभीररीत्या भाजली आहे.

  • 2/10

    ही घटना डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर परिसरात घडली. जखमीला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • 3/10

    हनुमंत मोरे असे जखमीचे नाव असून विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

  • 4/10

    डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर देवीचा पाडा परिसरात राहणारे हनुमंत मोरे रविवारी (१७ जुलै) पहाटे ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास उठले.

  • 5/10

    ते सकाळी अंघोळ करून देवपूजेसाठी अगरबत्ती पेटवण्यासाठी लायटर पेटवण्यासाठी गेले आणि घरातील सिलेंडरचा स्फोट झाला.

  • 6/10

    यावेळी घरात असलेले हनुमंत मोरे जवळपास ४० टक्के भाजले. स्फोटाचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

  • 7/10

    स्फोट झाल्याची माहिती मोरे यांच्या मुलाला व पोलिसांना देत त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

  • 8/10

    यानंतर त्यांच्या मुलाला याची माहिती मिळताच त्यांनी वडिलांना मुंबईच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले.

  • 9/10

    दुसरीकडे पहाटे झालेला हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटात घराचे पत्रे हवेत उडाले, तर स्वयंपाक घरातील बहुतांशी सामान जळाले.

  • 10/10

    या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. स्फोटाचं नेमकं कारण काय आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.

TOPICS
कल्याणKalyanकल्याण डोंबिवलीKalyan Dombivliगॅस सिलिंडरGas Cylinderब्लास्टBlast

Web Title: Photos of gas cylinder blast in house at kalyan dombivali pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.