• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. vp and president elecation this six leader served vice president and president post dpj

Photos : आत्तापर्यंत केवळ ‘या’ सहा व्यक्तींनी भूषवली आहेत भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्ही पदे

आज राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले तर येत्या ६ ऑगस्टला उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे.

Updated: July 18, 2022 18:30 IST
Follow Us
  • Jagdeep Dhankhad
    1/7

    पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांना एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्यात आले आहे. देशाचे विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ ११ ऑगस्ट रोजी संपत आहे. आत्तापर्यंत भारतात अशी फक्त सहा नावे आहेत जे उपराष्ट्रपतींनंतर भारताचे राष्ट्रपती झाले.

  • 2/7

    डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन १९५२ ते १९६२ पर्यंत देशाचे उपराष्ट्रपती होते. १९६२ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले आणि १९६७ पर्यंत ते या पदावर होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस आर्काइव्ह)

  • 3/7

    झाकीर हुसेन हे १९६२ ते १९६७ पर्यंत उपराष्ट्रपती होते. त्यानंतर ते १३ मे १९६७ ते ३ मे १९६९ पर्यंत देशाचे राष्ट्रपती होते.

  • 4/7

    व्ही.व्ही.गिरी १९६७ ते १९६९ पर्यंत देशाचे उपराष्ट्रपती राहिल्यानंतर १९६९ ते १९७४ पर्यंत राष्ट्रपती होते.

  • 5/7

    आर वेंकटरामन हे १९८४ ते १९८७ पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती होते. त्यानंतर १९८७ ते १९९२ पर्यंत त्यांनी राष्ट्रपती पद भूषवले. (छायाचित्र : राष्ट्रपती भवन सचिवालय)

  • 6/7

    १९८७ ते १९९२ पर्यंत देशाचे उपराष्ट्रपती असलेले शंकरदयाळ शर्मा यांनी १९९२ ते १९९७ पर्यंत राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. (छायाचित्र : राष्ट्रपती भवन सचिवालय)

  • 7/7

    केआर नारायणन हे उपराष्ट्रपती झाल्यानंतर राष्ट्रपती बनलेले शेवटचे व्यक्ती होते. १९९२ ते १९९७ पर्यंत ते उपराष्ट्रपती आणि १९९७ ते २००२ पर्यंत देशाचे राष्ट्रपती होते. (छायाचित्र : राष्ट्रपती भवन सचिवालय)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsराष्ट्रपतीPresident

Web Title: Vp and president elecation this six leader served vice president and president post dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.