-
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंनी २४ जुलैला ठाण्यातील सिग्नल शाळेला भेट दिली.
-
याचे फोटो आणि अनुभव त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून केलेल्या पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.
-
पुलाखालील मोकळ्या जागेत स्थलांतरित आणि अत्यंत गरीब विद्यार्थ्यांसाठी ही सिग्नल शाळा भरवली जाते.
-
या शाळेत अभ्यास वर्ग, प्रयोगशाळा, रोबोटिक लॅब, सिग्नल शाळा बँक आदी विविध उपक्रम राबविले जातात.
-
सिग्नल शाळेबद्दल भटू सावंत यांच्याकडून जाणून घेतल्यानंतर तिथे शिकणाऱ्या लहान मुलामुलींशीही अमित ठाकरेंनी गप्पा मारल्या.
-
“स्थलांतरित गरीब मुला-मुलींना शिक्षण देण्याचा हा प्रयोग खरोखरच आदर्श असा आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या नव्या शैक्षणिक धोरणात सिग्नल शाळेचा हा प्रयोग एक धोरण म्हणून स्वीकारायला हवा. महानगरांमध्ये राबवायला हवा”, असं अमित ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
भटू सावंत यांच्यासारख्या सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील प्रयोगशील कार्यकर्त्यांच्या पाठीशी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकाऱ्यांप्रमाणे समाजानेही भक्कमपणे उभं राहायला हवं, असं आवाहनही त्यांनी पोस्टमधून केलं आहे.
-
अमित ठाकरेंची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. (सर्व फोटो : अमित ठाकरे/ फेसबुक)
Photos : ‘राज्य सरकारने आपल्या नव्या शैक्षणिक धोरणात…’, ठाण्यातील सिग्नल शाळेला भेट दिल्यानंतर अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत
अमित ठाकरेंनी ठाण्यातील सिग्नल शाळेला भेट दिल्यानंतरचा अनुभव सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.
Web Title: Mns amit thackeray visit signal school in thane photos seeking attention on internet kak