• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sanjay raut brother sunil raut tell what happened after ed raid on 31 july pbs

Photos : “माझ्या आणि संजय राऊत यांच्या घरी ईडीचे २०-२२ अधिकारी…”, सुनिल राऊतांनी सांगितला ईडीचा छापा ते कोठडीपर्यंतचा घटनाक्रम

सुनिल राऊत यांनी मधल्या काळात नेमकं काय झालं याबाबत माहिती दिली आहे. ते सोमवारी (१ ऑगस्ट) न्यायालयाच्या निकालानंतर माध्यमांशी बोलत होते.

Updated: August 1, 2022 18:13 IST
Follow Us
  • ईडीने रविवारी (३१ जुलै) सकाळी साडेसात वाजता शिवसेना खासदार संजय राऊत व त्यांचं बंधू सुनिल राऊत यांच्या घरावर छापे टाकले.
    1/15

    ईडीने रविवारी (३१ जुलै) सकाळी साडेसात वाजता शिवसेना खासदार संजय राऊत व त्यांचं बंधू सुनिल राऊत यांच्या घरावर छापे टाकले.

  • 2/15

    त्यानंतर सायंकाळी ताब्यात घेतलं आणि मध्यरात्री पावणे एक वाजता अटक केल्याचं दाखवलं. आता सेशन कोर्टाने राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली.

  • 3/15

    त्यानंतर त्यांचं लहान बंधू सुनिल राऊत यांनी मधल्या काळात नेमकं काय झालं याबाबत माहिती दिली आहे. ते सोमवारी (१ ऑगस्ट) न्यायालयाच्या निकालानंतर माध्यमांशी बोलत होते.

  • 4/15

    सुनिल राऊत म्हणाले, “रविवारी सकाळी साडेसात वाजता माझ्या आणि संजय राऊत यांच्या घरी ईडीचे २०-२२ अधिकारी आले होते.”

  • 5/15

    “त्यानंतर ते साडेचार-पाच वाजेपर्यंत त्यांनी घराची छाननी केली आणि काही कागदपत्रे घेतली.”

  • 6/15

    “ते ५ वाजता आम्हाला ईडीच्या कार्यालयाकडे घेऊन आले.”

  • 7/15

    “साडेपाच-सहा वाजता आम्ही ईडी कार्यालयात पोहचलो.”

  • 8/15

    “रात्री १२.४० मिनिटांनी ईडीने अटक केले असं सांगितलं,” अशी माहिती राऊत यांनी दिली.

  • 9/15

    “आज (१ ऑगस्ट) सकाळपासून आम्ही न्यायालयात त्यांची वाट पाहत होतो.”

  • 10/15

    सुनिल राऊत पुढे म्हणाले, “साडेबारा-पावणे एक वाजता त्यांना जे. जे. रुग्णालयात घेऊन गेले. तेथे त्यांना सेशन कोर्टात आणण्यात आले.”

  • 11/15

    “न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. ईडीने त्यांच्याकडे आठ दिवसांची कोठडी मागितली. मात्र, न्यायालयाने केवळ तीन दिवसांची कोठडी दिली.”

  • 12/15

    “४ ऑगस्टला त्यांना परत न्यायालयासमोर हजर करतील,” असं सुनिल राऊत यांनी सांगितलं.

  • 13/15

    “मला विश्वास आहे संजय राऊत यांनी कुठलाही भ्रष्टाचार केलेला नाही. त्यांना केवळ भाजपाविरोधात बोलल्याची शिक्षा दिली जात आहे,” असा आरोप यावेळी सुनिल राऊत यांनी केला.

  • 14/15

    दरम्यान, राऊतांवरील ईडी कारवाईविरोधात राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.

  • 15/15

    शिवसैनिकांकडून ईडीची कारवाई राजकीय सुडापोटी झाल्याचा आरोप होत आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य : दीपक जोशी, नरेंद्र वासकर, पवन खेंगरे, एक्स्प्रेस फोटो)

TOPICS
ईडीEDशिवसेनाShiv Senaसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Sanjay raut brother sunil raut tell what happened after ed raid on 31 july pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.