Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. shinde fadnavis government sets record by issuing 749 resolutions in a month scsg

Photos: शिंदे सरकारने मंत्रिमंडळ स्थापन केलेलं नसतानाही महिन्याभरात काढलेल्या GR ची संख्या पाहिली का?; १४७ कोटींच्या ‘त्या’ प्रकल्पाचाही समावेश

शासन आदेशावरुन महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या भाजपाचा सहभाग असणाऱ्या सरकारनेच आता विक्रमी संख्येने जीआर काढलेत

August 3, 2022 19:04 IST
Follow Us
    shinde fadnavis government sets record by issuing 749 resolutions in a month
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर येऊन महिनाभर उलटून गेल्यावरही मंत्रिमंडळ विस्तार झाला नसला तरी या काळात ७५१ शासन आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
  • 1/13

    राज्य सरकारच्या निर्णयात-कारभारात शासन आदेश म्हणजेच जीआरला मोठे महत्त्व असते.

  • 2/13

    मंत्र्यांनी किंवा मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यानंतर शासन आदेश जाहीर होत नाही तोवर त्याची अंमलबजावणी होत नाही.

  • 3/13

    नियुक्ती, पदोन्नती, निधी मंजूर करणे अशा अनेक महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी त्या माध्यमातून होते.

  • 4/13

    त्यामुळेच महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्यावरही अशाप्रकारेच जीआर काढण्यात आलेले.

  • 5/13

    त्यामुळेच महाविकास आघाडी सरकार पायउतार होईपर्यंत अनेक निर्णयांवर शिक्कामोर्तब करणारे, विकासकामांना निधी मंजूर करणारे शासन आदेश काढण्यात आले होते.

  • 6/13

    त्यावर तत्कालीन विरोधी पक्ष भाजपातील नेत्यांनी आक्षेप घेतला होता.

  • 7/13

    आता सत्तांतर होऊन राज्यात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले.

  • 8/13

    महिना उलटून गेला तरी दोघांचेच मंत्रिमंडळ काम करत असून मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे.

  • 9/13

    तरीही या महिनाभरात तब्बल ७५१ शासन आदेश काढण्यात आले आहेत.

  • 10/13

    त्यामुळे सरकारचा कारभार मंत्रिमंडळाअभावी दमादमाने सुरू असला तरी शासन आदेश मात्र वेगाने निघत आहेत असे चित्र आहे.

  • 11/13

    शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघातील कामे, नियमित प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यक शासन आदेश यांचा त्यात समावेश आहे.

  • 12/13

    मेट्रो ३ प्रकल्पासाठी १४७ कोटी रुपयांचे कर्ज, शिंदे गटातील आमदार शंभूराजे देसाई यांचे आजोबा व महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकासाठी ५२ लाख रुपये आदींसह नियमित प्रशासकीय आदेशांचाही त्यात समावेश आहे.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra FadnavisशिवसेनाShiv Sena

Web Title: Shinde fadnavis government sets record by issuing 749 resolutions in a month scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.