• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. know who is next cji supreme court justice u u lalit pbs

Photos : स्पेक्ट्रम घोटाळ्यात सरकारी वकील ते देशाचे पुढील सरन्यायाधीश, कोण आहेत सिंधुदुर्गचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय लळीत?

न्यायमूर्ती उदय लळीत यांचा सिंधुदुर्ग ते देशाचे सरन्यायाधीश हा प्रवास कसा झाला याचा हा खास आढावा…

Updated: August 4, 2022 16:25 IST
Follow Us
  • सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणजेच ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची शिफारस केली आहे.
    1/18

    सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणजेच ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची शिफारस केली आहे.

  • 2/18

    या निमित्ताने न्यायमूर्ती लळीत यांचा सिंधुदुर्ग ते देशाचे सरन्यायाधीश हा प्रवास कसा झाला याचा हा खास आढावा…

  • 3/18

    न्यायमूर्ती उदय लळीत हे मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आहेत.

  • 4/18

    देवगड तालुक्यातील कोठारवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे.

  • 5/18

    लळीत यांचे पूर्वज अनेक वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील आपटे गावात स्थलांतरीत झाल्याचं सांगितलं जातं.

  • 6/18

    त्यानंतर लळीत कुटुंब कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले.

  • 7/18

    विशेष म्हणजे लळीत कुटुंबात पिढ्यान पिठ्या वकिलीचा व्यवसाय केला जातो.

  • 8/18

    आगामी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या कुटुंबात वडिलांपासून अगदी आजोबांपर्यंत अनेकांनी वकिली केली आहे.

  • 9/18

    पुढे उदय लळीत यांनीही तोच व्यवसाय निवडला.

  • 10/18

    मुंबईत वकिलीचं शिक्षण घेतल्यानंतर १९८३ मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली.

  • 11/18

    डिसेंबर १९८५ पर्यंत लळीत यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली.

  • 12/18

    त्यानंतर जानेवारी १९८६ मध्ये ते दिल्लीत स्थलांतरित झाले आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली केली.

  • 13/18

    एप्रिल २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वरिष्ठ वकिलीचा दर्जा दिला.

  • 14/18

    सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी मध्यस्थ निरिक्षक (‘एमिकस क्युरी’) म्हणून काम केलं.

  • 15/18

    प्रसिद्ध २ जी स्पेक्ट्रम घोटाळा खटल्यात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती.

  • 16/18

    यानंतर १३ ऑगस्ट २०१४ रोजी लळीत यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.

  • 17/18

    आता देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून त्यांच्या नावाची शिफारस झाली आहे.

  • 18/18

    न्यायमूर्ती लळीत ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सरन्यायाधीश पदावर असतील. (सर्व छायाचित्र – इंडियन एक्स्प्रेस)

TOPICS
एन व्ही रमण्णाNV Ramanaभारताचे सरन्यायाधीशChie Justice of Indiaसर्वोच्च न्यायालयSupreme CourtसीजेआयCJI

Web Title: Know who is next cji supreme court justice u u lalit pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.