• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • पावसाळी अधिवेशन
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mharahstra eknath shinde cabinet expansion unhappy shinde group mla scsg

Photos: …तर शिंदे गटात बंडाची शक्यता; मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या ‘त्या’ बैठकीत पाच आमदारांनी उघडपणे व्यक्त केली नाराजी

नाराजांना शांत करण्याची कसरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करावी लागली

Updated: August 10, 2022 16:32 IST
Follow Us
    mharahstra eknath shinde cabinet expansion unhappy shide group mla
    मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज झाले असून धुसफूस सुरू झाली आहे.
  • 1/21

    ‘मी दिलेला शब्द पाळणार आहे, थोडे सबुरीने घ्या’ असे आवाहन करत नाराजांना शांत करण्याची कसरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करावी लागली.

  • 2/21

    राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी होणार हे जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतील बंडावेळी मंत्रीपदाचे आश्वासन मिळालेले शिंदे गटातील अनेक आमदार आपले नाव आहे का नाही हे शोधण्यासाठी कामाला लागले.

  • 3/21

    मंगळवारी पहाटेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नावे अंतिम करण्यात गुंतले होते. पण केवळ नऊ जणांना शिंदे गटातून शपथ देण्यात येणार असल्याने नाराजी पसरली.

  • 4/21

    संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर, बच्चू कडू, आशीष जयस्वाल यांना मंत्रीपदाची संधी न मिळाल्याने ही मंडळी नाराज झाल्याचे कळते.

  • 5/21

    शपथविधीच्या कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात नाराजीचे सावट पसरू नये यासाठी शपथविधीच्या आधी सह्याद्री अतिथिगृहावर शिंदे गटाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली.

  • 6/21

    सह्याद्री अतिथिगृहामध्ये झालेल्या या बैठकीस शिवसेनेतील शिंदे गटातील आमदारांबरोबरच त्यांना सहकार्य करणाऱ्या छोट्या पक्षांचे व अपक्ष आमदारही उपस्थित होते.

  • 7/21

    या बैठकीत आमदारांच्या नाराजीचा स्फोट झाला.

  • 8/21

    शपथविधीच्या कार्यक्रमावर मोठय़ा प्रमाणात नाराजीचे चावट पसरू नये यासाठी शपथविधीच्या आधी सह्याद्री अतिथिगृहावर शिंदे गटाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली.

  • 9/21

    महाविकास आघाडीतून बाहेर पडताना आम्हाला मंत्रीपदाचा शब्द दिला होता. पण आता डावलले जात असल्याची नाराजी अनेक आमदारांनी बोलून दाखवली.

  • 10/21

    छोटे पक्ष व अपक्ष यांना मंत्रीपदाची संधी द्यावी लागेल. मागच्या मंत्रिमंडळात आम्ही मंत्री होतो. आता तो आमचा अधिकार आहे, अशी भावना बच्चू कडू यांनी व्यक्त केल्याचे समजते.

  • 11/21

    मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार होणार आहे. त्यावेळी आपल्या गटाला आणखीन दोन-तीन कॅबिनेट मंत्री पदे आणि पाच सहा राज्यमंत्रीपदे मिळणार आहेत. त्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल, असं शिंदेंनी नाराज आमदारांना सांगितलं.

  • 12/21

    भरत गोगावले हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडाच्या सुरुवातीपासून होते. त्यांना मंत्रिपद मिळेल अशी सर्वाची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही.

  • 13/21

    त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी गोगावले यांना आपल्या गाडीतून घेऊन जात त्यांचा सन्मान करत असल्याचा संदेश देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला

  • निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता मिळाल्यास ते भाजपाच्या पथ्यावर पडणार आहे.
  • 14/21

    सर्वोच्च न्यायालयाकडून आमदार अपात्रतेच्या याचिका विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणीसाठी पाठविल्या जातील आणि काही मुद्दे घटनापीठाकडे पाठविले जातील. त्यामुळे निर्णय लांबणीवर जाईल, अशी भाजपा नेत्यांना अपेक्षा आहे.

  • 15/21

    मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर शिंदे गटातील आमदारांची नाराजी वाढेल आणि काही जण उद्धव ठाकरेंकडे परत फिरतील, अशी भीती भाजपा नेत्यांना वाटत असल्याचं वृत्त यापूर्वीही समोर आलं आहे.

  • त्यामुळे शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून लवकरात लवकर मान्यता मिळाल्यास नाराज आमदार माघारी फिरण्याची शक्यता कमी होईल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही शिंदे गटास उपयोग होईल, अशी भाजपाची रणनीती आहे.
  • 16/21

    याच दुहेरी अडचणीमधून वाट काढण्यासाठी सध्या छोटेखानी मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आलाय.

  • 17/21

    एकूणच शिंदे गटातील आमदारांमध्ये सारे काही आलबेल नाही हाच संदेश विस्तारातून गेला आहे.

  • 18/21

    दुसऱ्या विस्तारात समावेश न झाल्यास शिंदे गटात बंड होण्याची शक्यता वर्तविली जाते.

TOPICS
एकनाथ शिंदे
Eknath Shinde
देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis
भारतीय जनता पार्टी
BJP
शिवसेना
Shiv Sena

Web Title: Mharahstra eknath shinde cabinet expansion unhappy shinde group mla scsg

IndianExpress
  • US trade pact still work-in-progress as negotiators return; deal not contingent on any date, says official
  • Pune woman techie rape case: No forced entry, no spray used, say police on rape allegations
  • IND vs ENG 2nd Test Day 3 Highlights: India 64/1 at Stumps on Day 3, lead England by 244 runs
  • CM Fadnavis says ‘won’t tolerate violence over Marathi’. But why it remains a flashpoint in Mumbai
  • Can Trump revoke Musk and Mamdani of their US citizenship?
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.