• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. bilkis bano case aimim asaduddin owaisi supreme court convicts nathuram godse sgy

“नशीब नथुराम गोडसेला तरी दोषी सिद्ध करुन फाशी दिली”

दोषींची सुटका केल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने सत्कार केल्यामुळे नाराजीत भर पडली आहे

August 19, 2022 19:10 IST
Follow Us
  • Bilkis Bano Supreme Court
    1/16

    सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो प्रकरणातील ११ दोषींची सुटका केल्यानंतर देशभरातून अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत.

  • 2/16

    दुसरीकडे, दोषींची सुटका केल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने त्यांचा सत्कार केल्यामुळे या नाराजीत भर पडली आहे.

  • 3/16

    यादरम्यान, मानवाधिकार कार्यकर्ते, इतिहासकार आणि नोकरशहा यांच्यासह अनेक प्रसिद्ध मंडळींना निवेदन प्रसिद्ध करत दोषींची सुटका रद्द करण्याची मागणी केली. तब्बल सहा हजारजणांनी या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.

  • 4/16

    धक्कादायक बाब म्हणजे, दोषींची सुटका केल्यानंतर भाजपाचे विद्यमान आमदार सीके राऊलजी यांनी या निर्णयाचं समर्थन केलं आहे. १५ वर्षांच्या शिक्षेनंतर मुक्त करण्यात आलेले ११ जण ब्राम्हण असून त्यांच्यावर चांगले संस्कार असतात, असं ते म्हणाले आहेत.

  • 5/16

    गुजरात सरकारच्या ज्या समितीने दोषींच्या सुटकेचा निर्णय घेतला आहे, त्यामध्ये सीके राऊलजी होते.

  • 6/16

    यासंदर्भात बोलताना एका मुलाखतीत ते म्हणाले, ”या प्रकरणातील ११ दोषी हे ब्राह्मण होते आणि ब्राह्मणांवर चांगले संस्कार असतात. कदाचित त्यांना या प्रकरणात अडकवण्यात आलं असावं, तसंच तुरुंगात असताना त्यांचे वर्तन चांगले होते”.

  • 7/16

    देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून राजकीय नेतेही यावर भाष्य करत आहेत. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीदेखील दोषींची सुटका केल्याने संताप व्यक्त केला असून, भाजपाला लक्ष्य केलं आहे. गुजरात असो अथवा कठुआ, भाजपा नेहमीच बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभी राहते असा आरोप ओवेसींनी केला आहे.

  • 8/16

    सीके राऊलजी यांच्या विधानावर त्यावर व्यक्त होताना ओवेसी म्हणाले की, “भयंकर गुन्हा केल्यानंतरही काही लोकांची जात त्यांना कारागृहात जाण्यापासून वाचवत असताना, काही लोकांचा धर्म आणि जात पुरावा नसतानाही त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी पुरेसं आहे”.

  • 9/16

    ओवेसी यांनी दोषींची सुटका रद्द करावी अशी मागणी केली आहे. “गोडसेला दोषी ठरवून फाशी दिली यासाठी आपण देवाचे आभार मानले पाहिजेत,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे.

  • 10/16

    १५ ऑगस्टला केलेल्या भाषणात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला सक्षमीकरणावर जोर देत असताना दुसरीकडे बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची गुजरात सरकारकडून सुटका करण्यात आली. यासंबंधी बोलताना ते म्हणाले “सीबीआय तपासानंतर दोषी ठरलेले असताना गुजरात सरकारने त्यांची सुटका करताना केंद्राची परवानगी घेतली होती का?” अशी विचारणा त्यांनी केली असून भाजपाचं लक्ष्य गुजरात निवडणुकीवर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

  • 11/16

    बिल्किस बानो यांची प्रतिक्रिया “या निर्णयावर तातडीने प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी मला शब्दच सुचत नव्हते. मी अजूनही सुन्नच आहे. या स्थितीत कोणाही महिलेला न्याय कसा मिळेल? माझा आपल्या देशातील सर्वोच्च न्यायव्यवस्थेवर विश्वास होता. हा धक्का पचवून, मी पूर्ववत जगू लागले होते. परंतु या दोषींच्या सुटकेने माझी अवघी शांतता हिरावली आणि आता माझा न्यायावरील विश्वास डळमळीत झाला आहे,” असं बिल्किस बानो यांनी सांगितलं आहे.

  • 12/16

    “माझे दु:ख आणि डळमळलेला विश्वास माझ्यापुरता नसून न्यायालयांत न्यायासाठी झगडणाऱ्या प्रत्येक महिलेला अशाने न्याय मिळेल का, याबद्दल शंका निर्माण झाली आहे. त्यांच्याबद्दल मला दु:ख वाटते. या दोषींच्या मुक्ततेनंतर गुजरात सरकारने माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी द्यावी,” अशी प्रतिक्रिया बिल्किस बानो यांनी दिली आहे

  • 13/16

    काय आहे प्रकरण – गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यास आग लावून झालेल्या हिंसाचारानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या भीषण दंगलीत दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील रणधिक्पूर गावात बिल्किस यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. या वेळी त्या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. तसेच त्यांच्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलीसह सात जण कुटुंबीयांची हत्या करण्यात आली होती.

  • 14/16

    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुजरात सरकारचा निर्णय १९९२ च्या माफी धोरणानुसार या दोषींच्या याचिकेवर विचार करावा, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुजरात सरकारने या ११ दोषींना मुक्त करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने या ११ आरोपींना २१ जानेवारी २००८ रोजी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यांची ही शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती.

  • 15/16

    या दोषींनी १५ वर्षांपेक्षा जास्त काळ कैदेत व्यतीत केल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने सर्वोच्च न्यायालयात शिक्षेत सवलतीची याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुजरात सरकारने या प्रकरणी एक समिती स्थापन केली. या समितीच्या निर्णयानुसार या ११ जणांच्या मुक्ततेचा निर्णय झाला होता.

  • 16/16

    (Photos: PTI/Video Screengrab)

TOPICS
असदुद्दीन ओवैसीAsaduddin Owaisiसर्वोच्च न्यायालयSupreme Court

Web Title: Bilkis bano case aimim asaduddin owaisi supreme court convicts nathuram godse sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.