असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांचा जन्म १३ मे १९६९ रोजी आंध्र प्रदेशातील हैदराबाद (आता तेलंगणा) याठिकाणी झाला. ते एक भारतीय राजकारणी असून विद्यमान लोकसभा खासदार आणि ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (AIMIM) ह्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत.
हैद्राबाद मतदारसंघातून सलग चारवेळा ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. असदुद्दीन ओवेसी यांनी १९९४ साली सर्वप्रथम चारमीनार मतदार संघातून निवडणूक लढवत आंध्र प्रदेश विधानसभेत निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.
सलग दोन वेळा आमदार आणि २००४ ते २०१९ असं सलग चारवेळा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले आहेत. ओवेसी यांनी निजाम महाविद्यालयातून (उस्मानिया विद्यापीठ) कला शाखेचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी लंडनमधील ‘लिंकन्स इन’ (Lincoln’s Inn)मधून बॅरिस्टरचं शिक्षण पूर्ण केलं आहे. Read More
उत्तर प्रदेशमध्ये शिक्षिकेने मुस्लीम विद्यार्थ्याला भरवर्गात उभं करून इतरांना मारायला सांगितलं. यावर असदुद्दीन ओवैसी यांनी मारहाणीचा व्हिडीओ ट्वीट करत तीव्र…
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत आहेत. त्यांच्या या दौऱ्याबाबत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी गंभीर…