Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. fastest train in india vande bharat express rajdhani tejas gatimaan express dpj

Photos : ‘या’ आहेत भारतातील सर्वात वेगवान रेल्वे; काही तासांमध्येच पूर्ण करतात लांबचे अंतर

August 23, 2022 19:12 IST
Follow Us
  • भारतात रेल्वेचे जाळे सगळ्यात मोठे आहे. ही रेल्वे जगातील चौथी सर्वांत मोठ्या रेल्वेसेवा आहे. १२.२७ लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे, कर्मचारीसंख्येत जगातील आठवी सर्वांत मोठी व्यावसायिक संस्था आहे.
    1/16

    भारतात रेल्वेचे जाळे सगळ्यात मोठे आहे. ही रेल्वे जगातील चौथी सर्वांत मोठ्या रेल्वेसेवा आहे. १२.२७ लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे, कर्मचारीसंख्येत जगातील आठवी सर्वांत मोठी व्यावसायिक संस्था आहे.

  • 2/16

    भारतात लांबचा पल्ला गाठण्यासाठी लोक रेल्वेचा वापर करतात. भारतात अशा अनेक रेल्वे आहेत ज्यांचा वेग सर्वाधिक आहे. ताशी १२० ते १८० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या रेल्वे काही तासांमध्येच लांबचे अंतर कापतात

  • 3/16

    भारतीय रेल्वे हा प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. रेल्वे दररोज हजारो गाड्या चालवते. लोकांचा वेळ वाचवण्यासाठी रेल्वेने गेल्या काही वर्षांत अनेक प्रीमियम ट्रेन सुरू केल्या आहेत.

  • 4/16

    याच्या मदतीने तुम्ही अवघ्या काही तासांत लांबचे अंतर कापू शकता. आम्ही तुम्हाला देशातील अशाच सर्वात वेगवान धावणाऱ्या रेल्वेची माहिती देणार आहोत

  • 5/16

    १५ फेब्रुवारी २०१९ रोजी देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वंदे भारत रेल्वेची सुरुवात झाली.

  • 6/16

    ही रेल्वे ताशी १८० किमी वेगाने धावते. ही ट्रेन नवी दिल्ली ते बनारस दरम्यान धावते.

  • 7/16

    गतिमान एक्सप्रेस ही देशातील दुसरी सर्वात वेगवान रेल्वे आहे. ही रेल्वे ताशी १६० किमी वेगाने धावते.

  • 8/16

    ही रेल्वे दिल्लीतील हजरत निजामुद्दीन ते झाशीपर्यंत धावते.

  • 9/16

    नवी दिल्ली- कानपूर शताब्दी ताशी १४० किमी वेगाने धावते.

  • 10/16

    ही रेल्वे दिल्ली ते कानपूर अवघ्या ४.५५ तासात पोहोचते.

  • 11/16

    नवी दिल्ली ते भोपाळला जाणारी भोपाळ शताब्दी ताशी १५० किमी वेगाने धावते.

  • 12/16

    ही रेल्वे फक्त ८.३० तासात दिल्लीहून भोपाळला पोहोचू शकते.

  • 13/16

    मुंबई ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेस रेल्वेचेही नाव वेगवान गाड्यांच्या यादीत समाविष्ट आहे.

  • 14/16

    ही रेल्वे ताशी १४० किलोमीटर वेगाने धावते. मुंबई ते दिल्लीतील अंतर ही रेल्वे अवघ्या १५ तासात कापते.

  • 15/16

    नवी दिल्ली ते हावडा दरम्यान धावणारी राजधानी ताशी १३५ किलोमीटर वेगाने धावते.

  • 16/16

    ही रेल्वे ३ मार्च १९६९ पासून धावत आहे. ही रेल्वेच्या प्रिमियम ट्रेनपैकी एक आहे.

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsस्पेशल ट्रेनSpecial Train

Web Title: Fastest train in india vande bharat express rajdhani tejas gatimaan express dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.