• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. aam adami party mla gathered at rajghat delhi to pay tribute to mahatma gandhi rvs

PHOTOS: दिल्लीच्या राजघाटावर ‘आप’चं शक्तीप्रदर्शन, सोमवारी केजरीवाल सरकार विश्वासदर्शक ठरावाचा सामना करणार

August 27, 2022 13:45 IST
Follow Us
  • delhi cm arvind kejariwal with aap mla at rajghat
    1/12

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन केलं. यावेळी आम आदमी पक्षाचे आमदार आणि इतर नेते उपस्थित होते. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)

  • 2/12

    दिल्लीतील राजकीय स्थितीसंदर्भात केजरीवाल यांच्या घरी पार पडलेल्या बैठकीनंतर आपच्या आमदारांनी राजघाटाकडे कूच केली. आपच्या या शक्तीप्रदर्शनावेळी ५० आमदार उपस्थित होते. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)

  • 3/12

    दिल्लीतील आम आदमी पक्षाचं सरकार पाडण्याचा भाजपा प्रयत्न करत असल्याचा आरोप आपच्या काही नेत्यांनी केला आहे. पक्ष सोडण्यासाठी भाजपाकडून १२ आमदारांना संपर्क साधण्यात आल्याचा दावा आप खासदार संजय सिंह यांनी केला आहे. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)

  • 4/12

    दिल्लीतील आमदारांना प्रत्येकी 20 कोटींची ऑफर भगव्या गोटातून मिळाल्याचा आरोप आपने केला आहे. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)

  • 5/12

    दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावरील छापेमारीदरम्यान घरातील गाद्या आणि भिंतीची सीबीआयनं झडती घेतली. मात्र, या छापेमारीत त्यांना एक रुपयाही भ्रष्टाचाराचा सापडला नाही, असे अरविंद केजरीवाल माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)

  • 6/12

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेचं विशेष अधिवेशन सोमवारी बोलवलं आहे. या अधिवेशनात केजरीवाल सरकार विश्वासदर्शक ठरावाचा सामना करणार आहे. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)

  • 7/12

    भाजपा आपचा एकही आमदार फोडू शकला नाही, हे सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)

  • 8/12

    दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेविरोधात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सध्या सीबीआयच्या रडारवर आहेत. त्यामुळे दिल्लीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)

  • 9/12

    दिल्लीच्या राजघाटावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)

  • 10/12

    मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानाबरोबरच दिल्लीतील ३१ ठिकाणांवर सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)

  • 11/12

    महाराष्ट्रात शिवसेना फोडून एकनाथ शिंदे गट वेगळा करण्यात भाजपाला यश आले. मात्र, मनीष सिसोदियांच्या बाबतीत त्यांना अपयश आले. आता हा प्रयोग ‘आप’च्या आमदारांवर सुरू झाला आहे, असे संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)

  • 12/12

    (हेही पाहा :‘हे’ आहेत जगातील टॉप १० अब्जाधीश, भारतातील दोन उद्योगपतींचा फोर्ब्सच्या यादीत समावेश )

TOPICS
अरविंद केजरीवालArvind Kejriwalआम आदमी पार्टीAAP

Web Title: Aam adami party mla gathered at rajghat delhi to pay tribute to mahatma gandhi rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.