-
ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. दोन दिवसांनी सप्टेंबर महिना सुरू होईल. त्यापूर्वी ३१ ऑगस्ट रोजी अनेक महत्त्वाच्या कामांची मुदत संपणार आहे. मात्र, ३१ ऑगस्टरोजी ही गणेश चतुर्थीची सुट्टी असल्याने बॅंकेची कामे करायला केवळ ३० ऑगस्ट म्हणजे आजचा दिवस आहे.
-
तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर ३१ ऑगस्टपर्यंत eKYCचे काम पूर्ण करावे लागले. eKYC पूर्ण करण्यासाठी सरकारकडून शेवटची संधी आहे.
-
याशिवाय १२वा हप्ताही योजनेअंतर्गत मिळणार आहे. तुम्ही eKYC न केल्यास तुमचा हप्ता थांबवला जाण्याची शक्यता आहे.
-
यापूर्वी, सरकारकडून eKYC करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. जी सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.
-
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसानचा योजनेचा १२वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाण्याची शक्यता आहे. या योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात.
-
तुमचे खाते पीएनबीमध्ये असल्यास, कोणत्याही परिस्थितीत ३१ ऑगस्टपर्यंत तुम्हाला eKYC पूर्ण करावे लागले. बँकेकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जर eKYC मुदतीत पूर्ण झाले नाही, तर खाते होल्ड केले जाऊ शकते.
-
पीएनबीने केलेल्या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे की, जर कोणत्याही ग्राहकाचे eKYC बाकी असेल तर ३१ ऑगस्टपर्यंत शाखेत जाऊन हे काम पूर्ण करावे लागेल.
-
जर करदात्याने ३१ जुलैनंतर आयटीआर भरला असेल तर त्याला पडताळणीसाठी ३० दिवस मिळतात. ३१ जुलैपर्यंत रिटर्न भरणाऱ्यांना पडताळणीसाठी १२० दिवस मिळतील.
-
अशा परिस्थितीत, जर करदात्याने १ ऑगस्ट रोजी त्याचे विवरणपत्र भरले असेल, तर त्याच्या पडताळणीची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपेल. पडताळणीशिवाय, परतावा पूर्ण मानला जाणार नाही.
PHOTOS : ३१ ऑगस्ट रोजी संपणार ‘या’ महत्त्वाच्या कामांची मुदत; जाणून घ्या…
ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. दोन दिवसांनी सप्टेंबर महिना सुरू होईल. त्यापूर्वी ३१ ऑगस्ट रोजी अनेक महत्त्वाच्या कामांची मुदत संपणार आहे.
Web Title: Photos deadline for kiran sanman yojna will end on 31st august spb