Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. fire in rural northern california thousands of people evacuated rvs

PHOTOS: उत्तर कॅलिफोर्नियात भीषण वणवा; हजारो लोक विस्थापित, वन्यजीव आगीच्या भक्ष्यस्थानी

उत्तर कॅलिफोर्नियातील ग्रामीण भागात हा वणवा पेटला आहे. यामुळे घरे, गाड्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

September 3, 2022 17:41 IST
Follow Us
  • उत्तर कॅलिफोर्नियातील जंगलांना भीषण आग लागली आहे. वाऱ्याच्या वेगाने ही आग आणखी पसरत चालली आहे.
    1/12

    उत्तर कॅलिफोर्नियातील जंगलांना भीषण आग लागली आहे. वाऱ्याच्या वेगाने ही आग आणखी पसरत चालली आहे.

  • 2/12

    या आगीमुळे काही जण जखमी झाले आहेत. परिसरातील जवळपास हजारो लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

  • 3/12

    या आगीच्या विळख्यात परिसरातील काही घरे, गाड्या देखील सापडल्या आहेत. यामुळे स्थानिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

  • 4/12

    शुक्रवारी दुपारपासून या जंगलांमध्ये ही आग धुमसत आहे. यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी राखीचा ढिगाराही बघायला मिळत आहे.

  • 5/12

    ही आग १०.३ चौरस किलोमीटर परिसरात पसरली आहे. कोरडे गवत आणि लाकडांमुळे ही आग वेगाने पसरत आहे.

  • 6/12

    वीड परिसरातील जवळपास सात हजार ५०० लोकांना घरे खाली करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. हेलिकॉप्टरच्या मदतीने ही आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.

  • 7/12

    हजारो जणांना या आगीमुळे रात्री भारनियमनाचा सामना करावा लागला. जंगलाला लागलेल्या आगीमुळेच वीज पुरवठा खंडित झाल्याचे ‘पॅसिफिक कोर्प’ या वीज कंपनीने म्हटले आहे.

  • 8/12

    जंगलांना आग लागताच लगतच्या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. याचा फटका जवळपास ९ हजार ग्राहकांना बसला आहे.

  • 9/12

    गेल्या काही दिवसातील कॅलिफोर्नियामधील ही सर्वात मोठी तिसरी आग आहे. दुष्काळाचे चटके सहन केल्यानंतर या परिसरातील नागरिकांना आता वणव्याचा सामना करावा लागत आहे.

  • 10/12

    या आगीत गाड्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

  • 11/12

    या आगीमुळे परिसरात उष्णतेची लाट आली आहे. काही परिसरांमध्ये उष्णता १०० डीग्रीपेक्षाही जास्त वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

  • 12/12

    (फोटो सौजन्य- रॉयटर्स)

TOPICS
आंतरराष्ट्रीय बातम्याInternational NewsआगFire

Web Title: Fire in rural northern california thousands of people evacuated rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.