Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. eknath shinde group vs uddhav thackeray group fight in buldhana scsg

Photos: खुर्च्यांची फेकाफेक, लाथाबुक्क्यांनी मारहाण, आमदार पुत्राचा समावेश अन् गोंधळ; शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदेगटाचा धुडगूस

विशेष म्हणजे उद्धव ठाकरे समर्थक गटाच्या कार्यक्रमामध्ये पोलिसांसमोरच शिंदेगटाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला.

Updated: September 3, 2022 17:52 IST
Follow Us
  • eknath shinde group vs uddhav thackeray group fight In buldhana
    1/18

    आजपर्यंत एकमेकांवर जहाल टीका करण्यापर्यंत मर्यादित असलेल्या शिवसेना आणि शिंदेगटातील वादाचे आज जहाल संघर्षात रुपांतर झाले.

  • 2/18

    आज बुलढाणा बाजार समितीत पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात हा प्रकार घडला.

  • उद्धव ठाकरे समर्थक गटाच्या या कार्यक्रमात शिंदेगटातील कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला.
  • 3/18

    यात सेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले.

  • 4/18

    प्राथमिक माहितीनुसार, शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली.

  • 5/18

    विशेष म्हणजे, पोलिसांसमोरच हा हल्ला झाला.

  • 6/18

    पोलिसांनी गोंधळ वाढू लागल्यानंतर हस्तक्षेप करत काही जणांना सभागृहाबाहेर काढलं.

  • 7/18

    खेडेकर यांनी हल्ला करणाऱ्यांत आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते, असा आरोप केला आहे.

  • 8/18

    या वादामधील आमदार पुत्राच्या सहभागासंदर्भातील अनेक चित्रफिती उपलब्ध आहेत.

  • 9/18

    सुमारे १५ मिनिटे चाललेल्या या राड्यात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

  • 10/18

    यावेळी खुर्च्यांची फेकाफेक करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

  • 11/18

    पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनाच सभागृहाबाहेर काढलं.

  • 12/18

    या कार्यक्रमाच्या ठिकाणी खुर्च्यांचा खच पडला होता.

  • 13/18

    अगदी सभागृहाच्या बाहेरही तुटलेल्या खुर्च्या पडल्याचं पहायला मिळालं.

  • 14/18

    घटनेनंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाली.

  • 15/18

    पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाल्यामुळे हल्ला करणाऱ्या शिंदेगटातील सैनिकांनी पोबारा केला.

  • 16/18

    सेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्या समर्थकांनी नंतर सभागृहाबाहेर घोषणाबाजी केली.

  • 17/18

    आवाज कुणाचा, शिवसेनेचा असं म्हणत वडले यांचे समर्थक घोषणाबाजी करत होते.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath ShindeशिवसेनाShiv Sena

Web Title: Eknath shinde group vs uddhav thackeray group fight in buldhana scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.