-
बंगरुळुसह कर्नाटक भागातील जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातलं आहे.
-
कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये सतत होत असलेल्या पावसामुळं कोरमंगलासह इतर परिसरात पाणी साचलं आहे. -
मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
-
शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.
-
शहरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं रहिवासी भागांमध्ये पाणी तुंबलं असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
-
पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
-
मुसळधार पावसामुळं शहरातील अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
-
याशिवाय रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहनं अर्धवट बुडाली आहे.
-
अनेक भागात वाहनं पुराच्या पाण्यात अडकून पडली आहे.
-
मुसळधार पावसामुळं वाहनधारकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
-
बचाव पथकाकडून पुरात अडलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
-
मुसळधार पावसामुळे हवामान विभागाकडून बंगळूरुसह कर्नाटकात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Photos : बंगळुरूत पावसाचे थैमान, रस्त्यांवर पाणीच पाणी; हवामान विभागाकडून धोक्याचा इशारा
देशात अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे तर दुसरीकडे काही राज्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये तापमान ४५ अंशांच्या आसपास पोहोचले आहे. तर आसाम, बंगळुरू आणि केरळसारख्या राज्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. बंगळुरुमध्ये मुसधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Web Title: Heavy rain in bengaluru photos orange alert issued by imd dpj