Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. prime minister narendra modi inaugurated kartavya path in delhi rvs

PHOTOS: दिल्लीतील ‘राजपथ’ आता ‘कर्तव्यपथ’; पंतप्रधानांच्या हस्ते नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण

‘‘गुलामगिरीचे प्रतीक असलेला राजपथ आता इतिहास जमा झाला आहे आणि कायमचा पुसला गेला आहे. आता हा ‘कर्तव्यपथ’ असेल”, असे उद्घाटन कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. हा सुधारीत मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी ‘सेंट्रल व्हिस्टा ’ प्रकल्पाचा एक भाग आहे.

Updated: September 9, 2022 17:41 IST
Follow Us
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी दिल्लीतील ‘कर्तव्यपथ’चे उद्धाटन करण्यात आले. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पांतर्गत इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन या सुमारे ३ किमीच्या ऐतिहासिक ‘राजपथ’चे सुशोभीकरण करण्यात आले आहे. हा मार्ग आता ‘कर्तव्यपथ’ म्हणून ओळखला जाणार आहे.
    1/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी दिल्लीतील ‘कर्तव्यपथ’चे उद्धाटन करण्यात आले. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पांतर्गत इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन या सुमारे ३ किमीच्या ऐतिहासिक ‘राजपथ’चे सुशोभीकरण करण्यात आले आहे. हा मार्ग आता ‘कर्तव्यपथ’ म्हणून ओळखला जाणार आहे.

  • 2/12

    ‘कर्तव्यपथ’ परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा २८ फुटांचा पुतळा उभारण्यात आला आहे. काळ्या रंगाच्या ग्रॅनाइटचा हा पुतळा २८० मेट्रिक टन वजनाचा आहे.

  • 3/12

    या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पूरी, जी. किशन रेड्डी, अर्जुन राम मेघवाल, मीनाक्षी लेखी आणि कौशल किशोर उपस्थित होते.(फोटो सौजन्य- ताशी तोबगयाल)

  • 4/12

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील या उद्घाटन कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती.(फोटो सौजन्य- ताशी तोबगयाल)

  • 5/12

    बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली होती.(फोटो सौजन्य- ताशी तोबगयाल)

  • 6/12

    उद्घाटन कार्यक्रमादरम्यान ‘कर्तव्यपथ’ आकर्षक रोषणाईने झळाळून निघाला होता. या कार्यक्रमाला दिल्लीकरांनी गर्दी केली होती.(फोटो सौजन्य- ताशी तोबगयाल)

  • 7/12

    कर्तव्यपथाच्या दुतर्फा ३.९० लाख चौरस मीटरचा परिसर हिरवळीने सुशोभित करण्यात आला आहे. या परिसरात १५.५ किमीचे नवे लाल ग्रॅनाईट वॉकवे तयार करण्यात आले आहेत.

  • 8/12

    या संपूर्ण भागात अकराशेहून अधिक वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. इंडिया गेटजवळ ३५ बसेस पार्क करता येणार आहेत.(फोटो सौजन्य- अनिल शर्मा)

  • 9/12

    ७४ ऐतिहासिक प्रकाश खांबांसह ९०० हून अधिक नवे प्रकाश खांबही बसवण्यात आले आहेत. सुमारे १ हजारपेक्षा जास्त पांढऱ्या आणि लाल वाळूच्या खडकांमुळे या परिसराला ऐतिहासिक स्वरुप प्राप्त झाले आहे.

  • 10/12

    या संपूर्ण परिसरात ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कृषी भवन आणि वाणिज्य भवनाजवळील कालव्यांमध्ये नौकाविहार करता येणार आहे.
     

  • 11/12

    कर्तव्यपथावरील आठ प्लाझांमध्ये दिल्ली पर्यंटन विभागांकडून दुकाने उभारण्यात आली आहे. या ठिकाणी पर्यटकांना विविध राज्यांच्या खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे.

  • 12/12

    (फोटो सौजन्य-इंडियन एक्स्प्रेस, ताशी तोबगयाल)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiसेंट्रल व्हिस्टा प्रकल्पCentral Vista Project

Web Title: Prime minister narendra modi inaugurated kartavya path in delhi rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.