• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. lok sabha elections 2024 home minister amit shah bihar seemanchal visit address a rally dpj

PHOTOS : नितीश कुमार सत्तेचे लोभी, पंतप्रधान बनण्यासाठी त्यांनी… अमित शाह यांची बिहारमध्ये जोरदार टीका; लालू प्रसाद यादवांनाही दिला सल्ला

नितीश कुमार यांनी एनडीएशी युती तोडल्यानंतर अमित शाह यांनी जोरदार टीका केली. शाह यांची महत्वाची विधानं…

Updated: September 24, 2022 19:55 IST
Follow Us
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बिहार दौऱ्यावर आहेत.
    1/1

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बिहार दौऱ्यावर आहेत.

  • 2/1

    आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानण्यात येत आहे.

  • 3/1

    भारतीय जनता पार्टीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमधील ४० पैकी ३२ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 

  • 4/1

    अमित शाह यांनी शुक्रवारी बिहारमधील सीमांचल भागाला भेट दिली. यादरम्यान त्यांनी एका सभेलाही संबोधित केले.

  • 5/1

    सभेदरम्यान त्यांनी लालूप्रसाद यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला.

  • 6/1

    १. नितीश कुमार यांनी पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेसशी हातमिळवणी करून भाजपचा विश्वासघात केला.

  • 7/1

    २, नितीश कुमारांना सत्तेचे लोभी.

  • 8/1

    ३. लालू यादव करत असलेल्या पक्षांतराच्या राजकारणामुळे बिहारमधील जनतेचे नुकसान होत आहे. ही जनतेची फसवणूक असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

  • 9/1

    ४.“नितीशकुमार यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही. म्हणून त्यांनी जातीपातीच्या राजकारणासाठी समाजवादाचा त्याग केला.

  • 10/1

    ५. माझ्या येण्याने लालू-नितीश जोडीच्या पोटात दुखत आहे. आम्ही येथे भांडण करण्यासाठी आलो असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मी इथे भांडण करायला आलो नाही.

  • 11/1

    ६. नितीशकुमार कोणत्याही राजकीय विचारसरणीच्या बाजूने नाहीत. नितीश समाजवाद सोडून लालूजींसोबत जाऊ शकतात, जातीवादी राजकारण करू शकतात. नितीश समाजवाद सोडून डावे, काँग्रेससोबतही बसू शकतात.

  • 12/1

    ७.नितीशकुमार यांचे एकच धोरण आहे – त्यांची खुर्ची सुरक्षित राहिली पाहिजे. ते राजद सोडून भाजपसोबत येऊ शकतात.

  • 13/1

    ८. नितीशकुमार यांनी २०१४ मध्येही असेच केले होते. ते ना घराचे आहेत ना घाटचे

  • 14/1

    ९. २०२४ च्या लोकसभा निवडणुका येऊ द्या, बिहारची जनता तुमच्या या जोडीला साफ करेल. २०२५ मध्येही येथे भाजप पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करेल.

  • 15/1

    १०. नितीशकुमार यांनी पंतप्रधान होण्याच्या हव्यासापोटी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. आता ते राजद आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत.”

  • 16/1

    ११. आमचा स्वार्थ आणि सत्तेपेक्षा सेवा आणि विकासाच्या राजकारणावर विश्वास आहे.

  • 17/1

    १२. बिहारची भूमी बदलाचे केंद्र बनली आहे. इंदिराजींनी आणीबाणी लादलेली इंग्रजांविरुद्धची स्वातंत्र्याची चळवळ असो की जयप्रकाश नारायणजींची लोकशाहीविरुद्धची चळवळ असो, त्याची सुरुवात बिहारच्या भूमीतून झाली आहे.

  • 18/1

    १३. सीमावर्ती जिल्ह्यात आदिवासींवर अत्याचार होत आहेत. त्यांना हाकलले जात आहे

  • 19/1

    १४. द्रौपदी मुर्मू यांना आदिवासी समाजाची अध्यक्ष बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केले आहे. डाव्या विचारसरणीच्या नक्षलवाद्यांना आम्ही इथून हाकलले आहे.

TOPICS
अमित शाहAmit Shah

Web Title: Lok sabha elections 2024 home minister amit shah bihar seemanchal visit address a rally dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.