-
बुधवारी (५ सप्टेंबर) शिवतीर्थावर उद्धव ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
-
मागील अनेक दिवस शिंदे गटाशी संघर्ष केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थ मैदान मिळालं आहे.
-
शिवसेनेत फूट पडल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा आहे.
-
त्यामुळे दोन्ही गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे.
-
याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हेही आज शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आले होते.
-
यावेळी आदित्य ठाकरेंसोबत खासदार अनिल देसाई, माजी नगरसेविका विशाखा राऊत, विभाग प्रमुख महेश सावंत, राहुल कनाल उपस्थित होते.
-
तयारीची पाहणी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दर्शन घेतलं.
-
यानंतर आदित्य ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील नवरात्रीनिमित्त बसवलेल्या देवीचंही दर्शन घेतलं आहे.
-
शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे.
दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी करायला आदित्य ठाकरे शिवतीर्थावर, बाळासाहेबांनाही केलं वंदन, पाहा PHOTOS
शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे आज शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आले होते.
Web Title: Aaditya thackeray visit shivtirt dasara melava rmm