-

शिवसेनेतील अदभूतपूर्व बंडानंतर ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाचं? असा संघर्ष शिंदे गट आणि शिवसेना यांच्या सुरू झाला. हा संघर्ष सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला.
-
मात्र, चिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक घेईल, असे न्यायालयाने सांगितले. त्यानुसार दोघांनीही निवडणूक आयोगात आपले म्हणणे मांडले.
-
त्यावर निर्णय घेत निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवण्याच निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी शिवसेना स्थापनेवेळेचा एक प्रसंग सांगितला.
-
ते म्हणाले, “बाळासाहेबांनी जेव्हा भूमिपुत्रांच्या विषयावर आंदोलन सुरू तेव्हा आमच्या घरी अनेकांची गर्दी होऊ लागली. एक दिवशी माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेबांना साठी संघटना सुरू करणार का, असे विचारले.
-
त्यावर बाळासाहेबांनी यावर विचार करत असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रबोधनकार ठाकरेंनी शिवसेना असे नाव सुचवले. त्यावेळी मी ६ वर्षाचा होतो.
-
जेव्हा शिवसेनेच्या स्थापनेच्या नारळ फोडला त्यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हणत नारळ वाढवण्यात आला.
-
नारळाच्या पाण्याचे तुषार माझ्या अंगावर उडाले, तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले होते”
-
दरम्यान, यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपावरही टीकास्र सोडले. “दसऱ्या मेळाव्यात मी उल्लेख केल्याप्रमाणे आता शिवसैनिकांना दमदाटी करणे सुरू आहे. शिंदे गटात प्रवेश करा नाही तर तुमच्यावर केसेस पडतील अशा धमक्यांना देण्यात येत आहेत.
-
ज्या शिवसैनिकांच्या जोरावर तुम्ही मोठे झालात, त्यांना धमक्या देताना काहीच वाटत नाही का? हेच तुमचं हिंदुत्त्व आहे का?” अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली.
-
“त्रिशुळ, मशाल आणि उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे.
-
त्याचसोबत ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना प्रबोधनकार ठाकरे’ आणि ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशी तीन नावेही निवडणूक आयोगाला सुचवण्यात आली आहेत,” असे उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
-
अंधेरीची पोटनिवडणूक लागली असून, चार दिवसांत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर एक चिन्ह आणि एक नाव द्या, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी यांनी निवडणूक आयोगाकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
PHOTO : “पहिला नारळ फुटला, अन्…”; उद्धव ठाकरेंनी सांगितला शिवसेना स्थापनेवेळीचा ‘तो’ प्रसंग
आज उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी शिवसेना स्थापनेवेळेचा एक प्रसंग सांगितला.
Web Title: Uddhav thackeray full speech remember incident on shivsena foundation day spb