Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ex cm uddhav thackeray talks about sharad pawar being strong refers ncp chief as storm scsg

शिंदेंविरुद्ध सत्तासंघर्ष सुरु असतानाच उद्धव ठाकरेंना आठवली ‘पवारांची पावसातली सभा’; म्हणाले, “वादळ असो, पाऊस…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या जाहीर भाषणामधून उद्धव ठाकरेंनी आव्हानही दिलं आहे.

Updated: October 13, 2022 19:21 IST
Follow Us
  • Ex Cm Uddhav Thackeray Talks About Sharad Pawar being strong refers NCP Chief as storm
    1/19

    राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वादळ असा उल्लेख केला आहे.

  • 2/19

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईमधील ष्णमुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते.

  • विशेष म्हणजे राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना शरद पवारांचं तीन वर्षांपूर्वीच साताऱ्यातील पावसातील भाषणही आठवलं.
  • 3/19

    उद्धव ठाकरेंनी भुजबळ यांचं कौतुक करतानाच २०१९ मधील शरद पवारांच्या पावसातील भाषणाचा अप्रत्यक्षपणे संदर्भ देत सध्याच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सूचक विधान केलं.

  • 4/19

    भुजबळांचा उल्लेख वादळ असा केल्याचा संदर्भ देत उद्धव यांनी, “अशी अनेक वादळं शिवसेनेनं अंगावर घेतली आहेत. त्या वेळेस अशी अनेक वादळं सोबत सुद्धा होती,” असं शिवसेनेच्या जुन्या दिवसांसंदर्भात विधान केलं. उद्धव यांच्या या विधानाला सध्याच्या राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी असल्याचं त्यांच्या बोलवण्यावरुन दिसून आलं.

  • 5/19

    तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दलही उद्धव यांनी सूचक विधान केलं.

  • 6/19

    “आताच्या या वादळामध्ये राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची ही मंचावरील मोठी मोठी वादळं सोबत आहेतच,” असं उद्धव म्हणाले.

  • 7/19

    पुढे बोलताना उद्धव यांनी २०१९ मध्ये साताऱ्याच्या जागेवर झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीमधील पावसातील गाजलेल्या भाषणाचा अप्रत्यक्षपणे संदर्भ दिला.

  • 8/19

    “इथं शरद पवारसाहेब आहेत. वादळ निर्माण करणारे,” असं उद्धव यांनी म्हणतात सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.

  • 9/19

    “हे (शरद पवार) सोबत असल्यानंतर वादळ असो पाऊस असो ते न डगमगता उभे राहतात,” असं उद्धव म्हणाले.

  • 10/19

    २०१९ साली झालेल्या साताऱ्यातील सभेमध्ये अचानक पाऊस आला तरी पवार भाषण देत होते. ते त्यांच्या जागेवरुन हललेही नाहीत. त्यांनी भाषण पूर्ण केलं होतं. त्याचसंदर्भातून उद्धव यांनी हे विधान केलं.

  • 11/19

    तसेच राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाविरुद्ध सुरु असणाऱ्या संघर्षाच्या संदर्भातून उद्धव यांनी, “त्यामुळे एवढ्या सगळ्यांची सोबत असल्याने मी लढाईच्या क्षणाचीच वाट बघतोय,” असंही म्हटलं.

  • 12/19

    भाषणाच्या शेवटाकडे उद्धव यांनी, “असो मी जास्त बोलत नाही नाहीतर भुजबळसाहेब म्हणतील कौतुक माझं आहे की तुझं आहे,” असं म्हणताच सारेजण हसू लागले.

  • 13/19

    उद्धव यांच्या नावाने घोषणाबाजी झाल्यानंतर ‘आगे बढो’ म्हणतायत तसं पाठीशीही राहा असं सूचक विधान त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. हे विधानही सध्याच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सूचक असं होतं.

  • तसेच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावरुन झालेल्या शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट राजकारणावरुन सूचक विधान उद्धव यांनी केलं.
  • 14/19

    “हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या, माझी तयारी आहे. एका मैदानात, व्यासपीठावर येऊ आणि काय व्हायचं ते होऊन जाऊ दे,” असंही म्हटलं.

  • 15/19

    उद्धव यांच्या या विधानानंतर कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजून त्यांचं समर्थन केलं.

  • 16/19

    या कार्यक्रमाला नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लाही उपस्थित होते.

  • 17/19

    फारुख अब्दुल्लांबद्दल बोलताना उद्धव यांनी, “आल्या आल्या मला म्हणाले की अजिबात घाबरु नकोस. लढ वडीलांसारखा लढ!,” असं म्हटलं.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayशरद पवारSharad Pawar

Web Title: Ex cm uddhav thackeray talks about sharad pawar being strong refers ncp chief as storm scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.