-
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या YCMH रुग्णालयाचा गलथान कारभार समोर आला आहे.(सर्व फोटो-अरुल होराएझन)
-
रुग्णालय प्रशासनाकडून मृतदेह अदलाबदली झाल्याची घटना घडली आहे.
-
मृतदेह अदलाबदली केल्यामुळे नातेवाईकांनी संतप्त होऊन YCMH चे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांच्या केबिनची तोडफोड केली आहे .
-
ज्या व्यक्तींना स्नेहलता गायकवाड यांचा मृतदेह देण्यात आला, त्यांनी त्यांचे मृत नातेवाईक समजून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
-
यामुळे संतप्त झालेल्या गायकवाड यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत तोडफोड केली.
-
या प्रकरणी अधिष्ठाता वाबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
-
मृतदेह अदलाबदली करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे.
-
दापोडी येथे राहणाऱ्या वृद्ध स्नेहलता गायकवाड या अंगावर भिंत कोसळून गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना त्यांचे कुटुंबीय खासगी रुग्णालयात घेऊन गेले. परंतु, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
-
मृतदेह महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नेहलता म्हणून दुसऱ्याच महिलेचा मृतदेह गायकवाड कुटुंबियांना दाखवण्यात आला. तर, स्नेहलता यांचा मृतदेह दुसरेच व्यक्ती घेऊन गेले होते.
PHOTOS : मृतदेह अदलाबदली झाल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णालयाच्या अधिष्ठाताची केबिन फोडली
संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड गोंधळ घातला.
Web Title: An angry mob of relatives ransack the cabin of ycmh dean dr rajendra wable after bodies were mistakenly exchanged by the staff msr