• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. important 10 statements of shivsena mp sanjay raut in front of uddhav thackeray after bail pbs

Photos : “मी न्यायाधीशांना हात जोडून नमस्कार केला, ते म्हणाले…”, उद्धव ठाकरेंसमोर संजय राऊतांनी केलेली महत्त्वाची १० विधानं

संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तिघांनीही पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊतांनी केलेल्या १० महत्त्वाच्या विधानांचा आढावा…

Updated: November 10, 2022 17:33 IST
Follow Us
  • जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (१० नोव्हेंबर) मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
    1/12

    जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (१० नोव्हेंबर) मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

  • 2/12

    यानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तिघांनीही पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊतांनी केलेल्या १० महत्त्वाच्या विधानांचा आढावा…

  • 3/12

    आम्ही सर्वजण कुटुंब आहोत, परिवार आहे. मी तुरुंगात गेलो मला खात्री होती, की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा वहिनी रश्मी ठाकरे हे सर्वजण माझ्या कुटुंबाची काळजी घेतील. त्या एका हिंमतीवर मी तुरुंगात गेलो – संजय राऊत

  • 4/12

    पक्षासाठी, शिवसेनेसाठी म्हणजे आमच्या शिवसेनेसाठी मला दहावेळा जरी तुरुंगात पाठवलं तरी मी जाण्यास तयार आहे – संजय राऊत

  • 5/12

    शेवटी कधीतरी पक्षासाठी त्याग करण्याची वेळ येते. त्यासाठी माझ्यासारख्याची तयारी नसेल, तर मला गेल्या ४० वर्षांत पक्षाने जे भरभरून दिलं आहे, त्याच्याशी ती कृतघ्नता ठरेल – संजय राऊत

  • 6/12

    आम्ही सगळे कितीही मोठे झालो, कितीही सर्वोच्चस्थानी पोहचलो तरी हे आम्हाला ज्या पक्षाने दिलेलं आहे. त्या पक्षाशी बेईमानी करणं आणि काहीतरी मला कुठून तरी सुटायचं आहे, मी केलेल्या पापापासून मला मुक्ती हवी आहे, म्हणून आई मानतो त्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणे आमच्या रक्तात नाही – संजय राऊत

  • 7/12

    महाराष्ट्रात एकच शिवसेना आहे, गट वैगेरे नाही. शिवसेना एकच आहे, जिचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत – संजय राऊत

  • 8/12

    हा न्यायालयाचा निर्णय आहे. मी काल निकालानंतर कृतज्ञता म्हणून न्यायाधीशांना हात जोडून नमस्कार केला. हे सर्व पाहून डोळे भरून आले. तेव्हा न्यायालयाने सांगितलं की, आभार कसले मानता. हे न्याय देवतेचं कर्तव्य आहे – संजय राऊत

  • 9/12

    तुमच्या प्रकरणात मेरिट आहे आणि तुमच्यावर अन्याय झाला हे स्पष्ट दिसत आहे. म्हणून मी हा निकाल देत आहे. मी असा निकाल दिला नसता तर या देशातील जनतेचा न्यायदेवतेवरील विश्वास उडून जाईल, असं न्यायाधीशांनी म्हटलं – संजय राऊत

  • 10/12

    एकांतवास खडतर असतो. मी तुरुंगात हाच विचार करत होतो की १०-१२ वर्षे सावरकर कसे राहिले? लोकमान्य टिळक मंडालेत कसे राहिले? किंवा आणीबाणीच्या काळात इतर बंदी तुरुंगात कसे राहिले? – संजय राऊत

  • 11/12

    लोक वर्षोनवर्षे राहत असतात, मी १०० दिवस राहिलो. मात्र, तिथे एक एक तास १०० दिवसांसारखा असतो. तुरुंगवासातील जगणं एकांतवासाचं असतं. त्याला तुरुंग म्हणतात. तिथं फक्त भिंती दिसतात – संजय राऊत

  • 12/12

    मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्याएवढी तुरुंगाची भिंत असते आणि आतमध्ये कोठडी असते. कैद्यांना केवळ भिंत दिसते, माणूस दिसत नाही – संजय राऊत

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayउद्धव ठाकरेUddhav ThackerayशिवसेनाShiv Senaसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Important 10 statements of shivsena mp sanjay raut in front of uddhav thackeray after bail pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.