-
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी जेजुरी गडावर येऊन दर्शन घेतले.
-
जेजुरी गडावर भंडारा-खोबऱ्याची उधळण आदित्य ठाकरेंनी केली.
-
गडावरील एक मण वजनाची प्राचीन तलवारही आदित्य यांनी उचलली.
-
आदित्य ठाकरे येणार असल्याने दुपारपासूनच कार्यकर्त्यांनी जेजुरीत मोठी गर्दी केली होती.
-
संध्याकाळी आदित्य जेजुरीत आगमन होताच आतषबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर आदित्य खंडोबा गडावर गेले.
-
आदित्य यांच्या समवेत आमदार सचिन अहिर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे, हवेली शिवसेनाप्रमुख संदीप धाडसी मोडक, तालुकाप्रमुख अभिजित जगताप, जेजुरी प्रमुख किरण डावलकर, डॉ. प्रसाद खंडागळे आदी उपस्थित होते.
-
खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त तुषार सहाणे, विश्वस्त राजकुमार लोढा, शिवराज झगडे यांनी खंडोबाची प्रतिमा देऊन आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.
-
मुख्य मंदिरामध्ये पूजा करून आदित्य यांनी देवदर्शन घेतले.
-
मुख्य मंदिरामध्ये पूजा करून आदित्य यांनी देवदर्शन घेतले.
-
पितळी कासवावर तळी भंडारा करून भंडार खोबऱ्याची उधळणही केली.
-
देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी गडावर असलेली प्राचीन एक मण वजनाची तलवार उचलण्याचे प्रात्यक्षिक आदित्य यांना दाखवले.
-
आदित्य ठाकरे यांनीही ही तलवार हातामध्ये उचलून घेतली.
-
“अनेक दिवसांपासून मनात होतं. काही वर्षांपूर्वी उद्धव साहेबांबरोबर आलो होतो,” असं आदित्य यांनी सांगितलं.
-
खंडोबा गडावर पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना काही राजकीय प्रश्न विचारले.
-
संजय राऊत यांच्या जामीनासंदर्भात प्रश्न विचारला असता “मी बाहेरच स्टेटमेंट दिलेलं. मंदिरात मी कधीही राजकीय वक्तव्य करत नाही. तर तेवढं तुम्ही मला विचारु नका,” असं आदित्य म्हणाले.
-
“मंदिराच्या आवारात मी राजकारणाचं काही बोलणार नाही. मला माफ करा,” असं आदित्य यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंना सांगितलं.
-
मी खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आलो असल्याने इतर कोणत्याही विषयावर बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
Photos: तळी भंडारा, तलवार अन्… जेजुरीत आदित्य ठाकरेंनी घेतलं खंडेरायाचं दर्शन; राऊतांबद्दल विचारल्यावर म्हणाले, “मंदिराच्या…”
राऊतांना जामीन मिळल्यावर ते तुरुंगातून बाहेर पडले त्याचवेळी आदित्य ठाकरे जेजुरी गडावर होते
Web Title: Aditya thackeray jejuri visit photos when ask about sanjay raut getting bail this is what he said scsg