• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. know what are the similarities between shraddha walkar murder and anupama gulati murder pbs

Photos : दिल्लीत श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे, देहरादूनमध्ये अनुपमाचे ७२ तुकडे; दोन्ही प्रकरणांमध्ये नेमकं काय साम्य?

अनुपमा गुलाटी हत्या प्रकरण काय होतं? त्या प्रकरणात नेमकं काय घडलं? श्रद्धा वालकर आणि अनुपमा गुलाटी प्रकरणात काय साम्य आहे? या सर्व गोष्टींचा हा आढावा.

Updated: November 17, 2022 13:45 IST
Follow Us
  • देशाची राजधानी दिल्लीत महाराष्ट्रातील वसईच्या श्रद्धा वालकरचा तिच्या प्रियकराने खून केला आणि आपला गुन्हा लपवण्यासाठी श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे करून जंगलात फेकत मृतदेहाची विल्हेवाट लावली.
    1/21

    देशाची राजधानी दिल्लीत महाराष्ट्रातील वसईच्या श्रद्धा वालकरचा तिच्या प्रियकराने खून केला आणि आपला गुन्हा लपवण्यासाठी श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे करून जंगलात फेकत मृतदेहाची विल्हेवाट लावली.

  • 2/21

    तब्बल सहा महिन्यांनंतर हे प्रकरण उघडकीस आलं आणि यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली.

  • 3/21

    सगळीकडे या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आणखी एक असंच प्रकरणही चर्चेत आहे.

  • 4/21

    या प्रकरणात अनुपमा गुलाटी या महिलेच्या पतीने तिची हत्या करून तब्बल ७२ तुकडे केले होते.

  • 5/21

    या निमित्ताने अनुपमा गुलाटी हत्या प्रकरण काय होतं? त्या प्रकरणात नेमकं काय घडलं? श्रद्धा वालकर आणि अनुपमा गुलाटी प्रकरणात काय साम्य आहे? या सर्व गोष्टींचा हा आढावा.

  • 6/21

    उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये २०१० मध्ये ३७ वर्षीय राजेश गुलाटी नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने पत्नी अनुपमा गुलाटीचा उशीने तोंड दाबून खून केला.

  • 7/21

    त्यानंतर इलेक्ट्रिक कटरने मृतदेहाचे ७२ तुकडे करून वेगवेगळ्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरले आणि फ्रीजमध्ये ठेवले.

  • 8/21

    पुढे दोन महिने त्याने एकएक पिशवी करून देहरादूनच्या वेगवेगळ्या भागात या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

  • 9/21

    मूळच्या दिल्लीच्या अनुपमा आणि देहरादूनच्या राजेशचं प्रेम होतं. त्यांनी दोघांनी १९९९ मध्ये लग्न केलं होतं.

  • 10/21

    पुढे राजेश गुलाटीचे कोलकातामधील एका महिलेशी विवाहबाह्य संबंध आहेत असा अनुपमाला संशय होता. यावरूनच दोघांमध्ये सातत्याने भांडण होत होतं.

  • 11/21

    श्रद्धा वालकर आणि अनुपमा गुलाटी खून प्रकरणात नेमकं काय साम्य होतं याचा आढावा खालीलप्रमाणे…

  • 12/21

    दिल्लीतील श्रद्धा वालकरचा खून आणि देहरादूनमधील अनुपमा गुलाटाची खून या दोन्ही प्रकरणांच्या बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य आहे.

  • 13/21

    राजेशने पत्नीच्या खूनानंतर शरीराचे तुकडे करण्यासाठी इलेक्ट्रिक कटरचा वापर केला. त्याचप्रमाणे आफताबनेही चाकूच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे केले.

  • 14/21

    दोघांनीही मृतदेहाचे तुकडे साठवण्यासाठी फ्रीज खरेदी केले.

  • 15/21

    तसेच दोघांनीही मोठा काळ टप्प्याटप्प्याने मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावली.

  • 16/21

    राजेशने कुटुंबाला आणि मित्रांना संशय येऊ नये म्हणून अनुपमाच्या इमेल आयडीवरून स्वतः मेल पाठवले.

  • 17/21

    दुसरीकडे आफताबने श्रद्धाच्या सोशल मीडिया अकाऊंटचा वापर करून मित्रांशी चॅटिंग केली, पोस्ट केल्या आणि श्रद्धाची खोटी उपस्थिती दाखवली.

  • 18/21

    आफताबने डेक्स्टर या अमेरिकन क्राईम शोमधून प्रेरणा घेतल्याचं म्हटलं, तर राजेशने हॉलिवूड चित्रपट पाहून पत्नीचा खून केल्याचं सांगितलं.

  • 19/21

    या प्रकरणात सप्टेंबर २०१७ मध्ये राजेशला पत्नीच्या खूनाच्या गुन्ह्यात दोषी मानून जन्मठेप झाली.

  • 20/21

    या प्रकरणात आता पुढील सुनावणी फेब्रुवारी २०२३ मध्ये होणार आहे.

  • 21/21

    सर्व फोटो सौजन्य – अनुपमा गुलाटी फेसबूक, इंडियन एक्स्प्रेस, एएनआय आणि पीटीआय (हेही वाचा – Photos : श्रद्धा हत्येप्रकरणी आफताबने कबुलीजबाब फिरवला तर? माजी DGP म्हणाल्या, “मी नेहमी सांगायचे…”)

TOPICS
उत्तराखंडUttarakhandक्राईम न्यूजCrime Newsदिल्लीDelhiदिल्ली हत्याकांडDelhi Murderहत्याकांडMurder

Web Title: Know what are the similarities between shraddha walkar murder and anupama gulati murder pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.