• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. aaditya thackeray slams cm eknath shinde and devendra fadnavis over mumbai ssa

“मुंबई तुमच्यासाठी सोन्याचं अंडी देणारी कोंबडी, पण आमच्यासाठी कर्मभूमी-जन्मभूमी”

“मर्जीतील लोकांना त्याचं टेंडर न मिळाल्याने ते रद्द करण्यात आले का?”

November 19, 2022 01:32 IST
Follow Us
  • मुंबई पालिकेतील कारभारावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंनी ताशेरे ओढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.
    1/9

    मुंबई पालिकेतील कारभारावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंनी ताशेरे ओढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.

  • 2/9

    पालिकेत टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास सुरु आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या रस्त्यांसाठी ५ हजार कोटींची घोषणा केली होती.

  • 3/9

    पण, मर्जीतील लोकांना त्याचं टेंडर न मिळाल्याने ते रद्द करण्यात आले का?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. पालिकेत चांगले काम करणारे अधिकारी आहेत. त्यांच्या ९० दिवसांत ६ बदल्या करण्यात आल्या.

  • 4/9

    काहींच्या तर २४ तासांत बदली केली गेली. प्रशासनात इतक्या तडकाफडली बदल्या होत नाही. एवढा गोंधळ का होतोय? कोणाच्या आदेशाने हे सुरु आहे?, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी केला आहे.

  • 5/9

    १ ऑक्टोंबर ते १ जून मध्ये मुंबईतील रस्त्यांची काम केली जातात. पण आता टेंडर रद्द करण्यात आल्याने, नवे टेंडर कधी काढले जाणार.

  • 6/9

    रस्त्यांची कामं कधी होणार आणि कोणत्या रस्त्यांची करण्यात येणार. रस्त्यांसाठी करण्यात आलेल्या पाच हजार कोटींच्या घोषणेमुळे मागील काम रखडली गेली आहे.

  • 7/9

    येत्या पावसाळ्यात जर मुंबईकरांचे त्रास सहन करावा लागला, तर याला घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि पालिकेचे प्रशासन जबाबदार राहिल, असेही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

  • 8/9

    मुंबई पालिकेतील कामकाजावर कोणाचं नियंत्रण आहे, कोण तेथील प्रशासन चालवत आहे, येथील कामकाजावर कागदांवर कोणाचं कोणाच्या सह्या होत आहेत?, असे सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

  • मुंबई ही तुमच्यासाठी सोन्याचं अंडी देणारी कोंबडी असेल, मात्र ती आमच्यासाठी आमची कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra FadnavisशिवसेनाShiv Sena

Web Title: Aaditya thackeray slams cm eknath shinde and devendra fadnavis over mumbai ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.